आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Railway Station Get Honored Of A One Grade

ए वन ! सोलापूर स्थानकाला रेल्वे मंत्रालयाकडून दर्जा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- तमाम सोलापूरकरांसाठी एक अभिमानाची, आनंदाची बातमी..सोलापूर रेल्वे स्थानकाला ए वन दर्जा मिळालाय. देशातल्या आदर्श रेल्वे स्थानकात आपल्या स्थानकाची गणना झालीय. उत्पन्न आणि सोयी-सुविधांच्या उपलब्धतेचे निकष तपासून रेल्वे मंत्रालयाने हा दर्जा दिलाय. त्यानिमित्ताने आता स्थानकावर काही नवी कामेही होणार आहेत. मंत्रालयाने मध्य रेल्वेतील काही निवडक स्थानकांनाच हा ए वन दर्जा दिलाय. यात सोलापूरचाही समावेश आहे हे विशेष. रेल्वे प्रशासनाने कामांची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू केले आहे. येत्या काही दिवसांत रेल्वेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही कामे होणार आहेत. यासाठी 2 ते 3 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

असा मिळाला दर्जा
रेल्वे स्थानकाचे निव्वळ वार्षिक प्रवासी उत्पन्न 60 कोटींहून जास्त असावे. ते बिगर उपनगरी स्थानक असल्यास त्याला ए-वन दर्जा मिळतो. सोलापूर रेल्वे स्थानकाचे 2011- 12 चे निव्वळ प्रवासी वार्षिक उत्पन्न 73 कोटी रुपये आहे. शिवाय ते बिगर उपनगरी स्थानक आहेच.

सोयीसुविधांची रेलचेल होणार

* फलाट क्रमांक एकवर एक्सलेटर बांधणार. दोन कोटींचा खर्च अपेक्षित.

* अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विशेष कक्ष अद्ययावत होणार.

* पादचारी पुलाशेजारी लिफ्ट, ट्रॅव्हलेटर किंवा रॅम्प उभारले जाऊ शकते.

* आरक्षण केंद्रावरील खिडक्या सातवरून 15 होणार.

* प्रवाशांना माहिती घेण्यासाठी टच स्क्रिन सिस्टिम बसवणार.

* प्रवाशांसाठी इंटरनेट कॅफे सुरू करणार, प्रिपेड टॅक्सीची सोय होऊ शकेल.

बदलाची नांदी

रेल्वे मंत्रालयाच्या नियमानुसार स्थानकांचे वर्गीकरण झाले आहे. त्यानुसार सोलापूर रेल्वे स्थानक आता ए-वन दर्जाचे बनले आहे. स्थानकांवरील बदलांस लवकरच सुरुवात होईल. हे प्रवाशांच्या फायद्याचे ठरेल. सुशील गायकवाड, जनसंपर्क अधिकारी