आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Railway Station Station Tw Accelerator Stair Granted

रेल्वे प्रवाशांसाठी येणार चीनमधून सरकते जिने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणे सुरू झाले आहे. रेल्वे मंडळाकडून दोन सरकते जिने (एक्सलेटर्स) मंजूर झाले आहेत. दोन्ही जिने चीनमधून आयात केले जाणार आहेत. यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याच्या खरेदीस लवकरच रेल्वे मंडळाकडून हिरवा कंदिल मिळेल, अशी आशा रेल्वे प्रशासनास आहे.

देशातील रेल्वे स्थानकावर प्रामुख्याने जॉनसन अँन्ड जॉनसन कंपनीचे जिने बसवले जातात. सोलापुरातही त्याच कंपनीचे बसवण्यात येतील. रेल्वे बोर्डाने कंपनीशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.

प्रवाशांचा फायदा
सोलापूर रेल्वे स्थानकासाठी दोन एक्सलेटर्स मंजूर झाले आहेत. सोलापूर स्थानकावर बसवण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांचा चांगला फायदा होणार आहे.’’ जॉन थॉमस , सोलापूर रेल्वे व्यवस्थापक

रेल्वेमंत्री प्रयत्नशील
केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे सोलापूर स्थानकाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. स्थानकाच्या विकासासाठी जवळपास 6 ते 7 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. थेट निधी मिळाला नाही तर 2014 च्या अंदाजपत्रकात निधी उपलब्ध करून देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

ज्येष्ठांना फायदा
एका प्लॅटफार्मवरून दुसर्‍या प्लॅटफार्मवर जाण्यासाठी सध्या सोलापूर स्थानकावर पादचारी पूल आहेत. जी व्यक्ती अपंग आहे अथवा ज्या व्यक्तीला चालून एका प्लॅटफार्मवरून दुसर्‍या ठिकाणी जाणे शक्य नसेल त्यांच्यासाठी सध्या चाकाच्या खुर्चीची सोय आहे. मात्र, ती पुरेशी नाही. आता थेट सरकते जिने बसणार असल्याने ज्येष्ठांसह, गर्भवती, लहान मुले यांची सोय होणार आहे.

एक आणि तीन क्रमांकाच्या फलाटावर बसणार जिने
सोलापूर रेल्वे स्थानकात असलेल्या प्लॅटफार्म 1 व 3 क्रमांकावर जिने बसवण्यात येणार आहेत. प्लॅटफार्म 1 वर दौंडच्या दिशेकडे असलेल्या पादचारी पुलाजवळ ते बसवण्यात येणार आहेत. तर प्लॅटफार्म क्रमांक 3 वर वाडीच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलाजवळ बसवण्यात येणार आहे.