आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेपा होणार एकूण २२, वशेष रेल्वेला सोलापूर थांबा नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मध्यरेल्वेने दसरा- दिवाळीसाठी पुणे-भुवनेश्वर विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला तीनच थांबे असून त्यात सोलापूरचा समावेश नाही. पण, ती जवळच्या वाडी स्थानकावर थांबणार आहे.
विशेष प्रीमियम गाडी प्रथमच प्रवाशांच्या भेटीला येत असून ती तब्बल २२ खेपा करणार आहे. या गाडीला दुरांतो एक्स्प्रेसचा दर्जा आहे. त्यामुळे केवळ तीन थांबे दिलेल्‍या आहेत. पुणे येथून दर मंगळवारी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी ती निघेल. भुवनेश्वरला दुससायंकाळी वाजून ३५ मिनिटांनी पोहचेल. भुवनेश्वरहून दर रविवारी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी निघेल आणि पुण्याला दुसऱ्या िदवशी पहाटे वाजून मिनिटांनी पोचेल. या गाडीला वाडी, सिकंदराबाद विजयवाडा असे तीन थांबे आहेत.
दहा शयनयान, एक तृतीय श्रेणी वातानुकूलित, एक द्वितीय श्रेणी वातानुकूलित आणि एक स्वयंपाकाचा डबा असेल. तिकीट विक्री २० सप्टेबरपासून सुरू झालेली आहे. प्रिमीयम असल्याने केवळ इंटरनेटवर आरक्षित तिकीट घेता येईल. उद्या मंगळवारी प्रथमच ती पुणे येथून सुटणार आहे. डिसेंबरपर्यंत ती धावेल.
मंगळवारपासून धावणार-
मंगळवारपासूनपुणे-भुवनेश्वर रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. अप आणि डाऊन अशा २२ गाड्या धावणार आहेत.” नरेंद्रपाटील, मुख्यजनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई
सोलापूरला थांबावी
प्रिमीयमदर्जाची गाडी सुरू होणे विशेष बाब आहे. मात्र, सोलापूरसारख्या एवन दर्जा असलेल्या स्थानकावर थांबा देता वाडीला थांबा देणे योग्य नाही. सोलापूरला ती थांबावी.” संजयपाटील, उपाध्यक्ष,जिल्हा प्रवासी संघ, सोलापूर