आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळाचा तडाखा, शोरूमच्या गाड्या बनल्या भंगार,

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गुरुवारी आलेल्या वादळी वार्‍यामुळे अक्कलकोट रस्तालगतच्या टाटा कमर्शियल चव्हाण अँटोव्हिल्स शोरूमचे छात कोसळून नवीन आठ वाहनांची मोठी हानी झाली.

‘वीज खंडित’च्या 955 तक्रारी
वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांना शुक्रवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. वीजपुरवठा खंडितच्या 955 तक्रारी वीज कंपनीकडे आल्या आहे. याशिवाय सहा खांब कोलमडून पडले होते. गेल्या 24 तासांपासून एकूण 265 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

सेट टॉप बॉक्स बंद
वादळी वारा, पावसामुळे विजेचा दाब कमी-अधिक झाल्याने अनेक भागांत सेट बॉक्स व टीव्ही बंद पडले आहेत. 1 एप्रिलपासून हे सेट टॉप बॉक्स बसवले होते.

15 दिवसांपूर्वी झाले होते उद्घाटन
गुढीपाडव्याला झाले होते शोरूमचे उद्घाटन. अक्कलकोट रस्तालगत शोरूम उभारले. गुरुवारी अचानक आलेल्या वादळी वार्‍याच्या तडाख्यात 55 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती शिवप्रकाश चव्हाण यांनी दिली.

नुकसान
छत पडल्यामुळे एक विंगर, एक मोठी मालवाहतूक, दोन छोटा हत्ती, एक मॅजिक, एक झिप अशा आठ नवीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. नव्याने केलेले फर्निचर आणि इलेक्ट्रिक फिटिंग्ज आणि काच सामानाचेही मोठे आर्थिक नुकसान झाले.