आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून तिघांकडून अत्याचार; आरोपींना पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - तरुणीस विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक व अत्याचार केल्याप्रकरणी तिघा आरोपींना न्यायदंडाधिकारी ए. ए. शिंदे यांनी पोलिस कोठडी सुनावली. तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून आरोपी सोमलिंग अर्जुन फुलारी (वय 35, रा. बोळकवठा, ता. दक्षिण सोलापूर), संजय गौडप्पा बिराजदार (वय 25, रा. आशा नगर, एमआयडीसी, सोलापूर) व प्रकाश बलभीम गायकवाड (वय 28, रा. पिंपळवाडी, ता. राहता, जि. नगर) यांनी अत्याचार केले होते. तिघांनी तिला 31 ऑगस्ट रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास एअरगन दाखवून धमकी दिली. पांढर्‍या स्कॉर्पिओतून पळवले.