आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Resident Now Get Water Supply After Three Day Gap

सोलापूरवासीयांना आता पाणीपुरवठा तीन दिवसांआड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उजनी धरणातील पाण्याची पातळी वजा 43 टक्के इतकी आहे. उजनीमधून मिळणार्‍या पाण्यात 35 एमएलडी तर हिप्परगा तलावाचा पाणीपुरवठा बंद ठेवल्याने 10 एमएलडी असे सुमारे 45 एमएलडी पाण्याच्या टंचाईमुळे शहरात पाणी कपात झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरवासीयांना तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती मनपा आयुक्त अजय सावरीकर यांनी दिली.


उजनी धरणातील पाण्याची पातळी घटल्याने चर खोदून दुबार पंपिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तरीही उजनी पंपहाऊसमधील चार पैकी तीनच पंप सुरू आहेत. त्यामुळे उजनी येथून जलवाहिनीद्वारे येणारे पाणी हद्दवाढ भागात पुरेशा दाबाने पोहोचू शकत नाही. उजनीत दहा एचपीचे 20 पंप असून, 30 एचपीचा एक पंप मंगळवारी बसवला आहे. गरजेनुसार बुधवारी आणखी एक पंप बसवण्यात येणार आहे.


दररोज 40 एमएलडी पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने दोन ते तीन लाख नागरिकांना पाणी कमी मिळते. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यात सुरळीतपणा आणण्यासाठी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची अमलबजावणी बुधवारपासून करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी दिली.


चिंचोळी आणि शहरातील एमआयडीसीमधील उद्योगांना दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. ज्या भागात पाणीपुरवठा सुरू आहे, त्या परिसरात त्या काळात वीजपुरवठा खंडित करण्याचा विचार सुरू असल्याचे आयुक्त सावरीकर म्हणाले. सोमवारी दुपारी आ. प्रणिती शिंदे, महापौर अलका राठोड आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती मिळाली.