आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरचे रिटायरींग रूम झाले ऑनलाइन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रेल्वे स्थानकावरील रिटायरींग रूमचे ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात आले. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना बाहेरील हॉटेल्स अथवा लॉजेस तुलनेने कमी दरात व चांगल्या सोयींनी युक्त रूममध्ये राहता यावे म्हणून ते बांधण्यात आलेले आहे. उपक्रम राबविणारा मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग दुसरा ठरला आहे. स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर 5 रूम बांधण्यात आलेल्या आहेत. रेल्वेचा प्रवासी कोणत्याही वर्गाने प्रवास करणारा हवा आहे. ऑनलाइन पध्दतीमुळे ही सेवा असलेल्या देशातील स्थानकावर सोलापुरातून रूम बुक करता येईल. सुमारे 120 दिवस अगोदर रूमची नोंदणी करण्यात येऊ शक ते. सुमारे 33 रेल्वे स्थानकावर ही सेवा सुरू आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावरील रूमचे दर वेगवेगळे आहेत.
ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून प्रवाशांना घरबसल्या रूमचे बुकिंग करता येणार आहे.’’ सुशील गायकवाड, वरिष्ठ वाणिज्य मंडळ व्यवस्थापक