आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवित्र मास: रेवणसिद्धेश्वरांची पालखी व रथोत्सव महारूद्राभिषेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोलापूर- श्रावणमासाच्या पहिल्या दिवशी बुधवारी सिद्धरामेश्वर आणि रेवणसिद्धेश्वर मंदिर येथे विविध कार्यक्रम झाले. येथे पहाटेपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली. पुजारी शशिकांत हब्बू, शिवकुमार हब्बू, प्रशांत हब्बू यांच्या उपस्थितीत रूद्राभिषेक, पानपूजा व तांदूळपूजा झाली. पहाटे योगदंडाची चौथरा पूजा झाली. मुख्य मंदिरात रूद्राभिषेक झाले. सिद्धरामेश्वर मंदिरात महिलांसाठी खास दर्शनबारी तयार करण्यात आली होती. मंगलारतीने, घंटानादाने वातावरण भारले.

बमलिंगेश्वर मठातर्फे ज्योत
हत्तूर येथील वीरशैव बमलिंगेश्वर मठातर्फे सिद्धरामेश्वर मंदिर ते हत्तूर मठापर्यंत ज्योत पायी नेण्यात आली. बाराबंदी घातलेले भक्त सहभागी होते. मंद्रूपचे रेणुकशिवाचार्य स्वामी, बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंडा-पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश हसापुरे, पोलिस निरीक्षक विकास रामगुडे उपस्थित होते. तेथे दररोज महांतेश हिरेमठ स्वामी (तद्देवाडी) यांचे शरणबसवेश्वर पुराणावर प्रवचन असल्याची माहिती चंद्रशेखर भरले यांनी दिली. यात्रेत सूर्यकांत पाटील, सूर्यशेखर पाटील, नागनाथ गुंडू, गुंडेराव सारवडे, अण्णाराव पाटील, महांतप्पा उपासे आदी सहभागी झाले.

रेवणसिद्धेश्वर मंदिरामध्ये रूद्राभिषेक
विजापूर रस्ता येथील रेवणसिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पुजारी बाळासाहेब शिंगारे, अप्पासाहेब शिंगारे, रेवणसिद्ध शिंगारे यांच्या उपस्थितीत तांदूळपूजा, पानपूजा, रूद्राभिषेक, महारूद्राभिषेक आदी कार्यक्रम होतील.

रेवणसिद्धेश्वर यात्रा रविवारी सुरू होत आहे. चारही रविवारी पालखी सोहळा व रथोत्सव होणार आहेत. जोडभावी येथील चिद्रे वाड्यातून पालखी मिरवणूक निघेल. भुसार गल्ली, विजापूर वेस, गुरू भेट, डाक बंगला मार्गे विजापूर रोड रेवणसिद्धेश्वर मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक निघेल. याच मार्गाने मिरवणूक पुन्हा सायंकाळी निघेल. जोडभावी पेठ येथे विसजिर्त होईल. यात्रेची सांगता रथोत्सवाने होईल. दुपारी चार वाजता पालखी व रथ यांची मिरवणूक जोडभावी पेठ येथून निघेल. कोंतम चौक, समाचार प्रेस, विजापूर वेस मार्गे गुरूभेटपर्यंत निघेल व पुन्हा जोडभावी पेठ येथे विसजिर्त होईल.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, सोलापुरात पाच ईदगाह आणि 225 मशिदीत होणार नमाज