आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ए भाई जरा देख के चलो, आगे ही नहीं पिछे भी हैं गढ्ढे; खड्डय़ांनी होताहेत हाडे खिळखिळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - खराब रस्त्यांमुळे व खड्डय़ांमुळे केवळ माणसांच्या पाठीच्या मणक्यांचीच नाही तर दुचाकी व चारचाकी वाहनांचीही वाट लागत आहे. खड्डय़ांमुळे टायर ट्यूबपासून कारच्या बॉडीपर्यंत अनेक पार्ट्स खराब होत आहेत. त्यामुळे सोलापूरकरांच्या खिशाला चांगलीच चाट बसत आहे. काही वाहनांची किरकोळ दुरुस्तीपासून अनेक कामे करावी लागत आहेत. याचा सोलापूरकरांना नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे पुढे आले आहे.

सोलापूर शहरातील रस्त्यांवर एक ते दीड इंचापासून 4 ते 5 इंच खालीपर्यंतचे शेकडो खड्डे आहेत. खड्डय़ांच्या दणक्यांनी मणक्यांच्या दुखापतीसह कंबर, मान आणि पाठीचे दुखणे वाढले असून, अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

काही केल्या तोडगा निघेना
शहराच्या विविध भागांतील रस्तेच नव्हे तर व्हीआयपी रस्त्यांसह सर्व प्रमुख मार्गांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. दिव्य मराठीने यावर वेळोवेळी प्रकाश टाकूनही प्रशासन ढिम्म आहे.

हे आजार होतात
रस्त्यावरील अती खड्डय़ांमुळे मणक्यांचा त्रास वाढतो.
कंबरेची गादी सरकून कंबरदुखी वाढते.
माकडहाड खाली-वर सरकल्यास पाठदुखीचा त्रास वाढतो.
दणक्यांमुळे हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते.
दणक्यांमुळे वृद्ध व्यक्तींचा पाठदुखीचा त्रास वाढतो.

असा बसतो दणका
वाहन अचानक खड्डय़ातून गेले तर कंबरेपासून ते मानेपर्यंतच्या भागाला जोरदार झटका बसतो. त्यामुळे कंबरेच्या वरील माकड हाड व पाठीचा मणका दाबला जाऊन मानेपर्यंत त्याच्या वेदना जाणवतात.

कधी कधी थेट मेंदूपर्यंत कळ जाते. हाडे ठिसूळ असलेल्या व्यक्तीला हा धक्का अतिशय वेदनादायी ठरतो, तर मजबूत शरीरयष्टी असलेल्यांना या दणक्याचा परिणाम काही काळाने जाणवतो.

श्वसनाचे विकार वाढतात
सोलापूर शहरात 52 टक्के धुळीचे प्रमाण आहे. त्यामुळे श्वसनाचे विकार मोठया प्रमाणात होतात. पाऊस पडून गेल्यानंतर धुळीच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे अँलर्जी असणार्‍या रुणांना त्रास होतो. सर्दी, खोकला आणि डोळे चुरचुरणे आदींचा त्रास होऊ शकतो. तसेच धुळीमुळे त्वचेचे विकार होतात. डॉ. विद्याधर सूर्यवंशी, फिजिशियन

आयुष्यभराचे दुखणे
खड्डय़ांच्या दणक्यांनी पाठीच्या मणक्यांसह कंबर वा मानेला बसलेला झटका किमान आठ ते दहा आठवड्यांपर्यंत किंवा आयुष्यभरासाठीचे दुखणे होऊ शकते. अशक्त बांधा असलेल्या व्यक्तींना या समस्या तर अधिक त्रासदायक ठरतात. यावर उपाय म्हणजे गाडी चालवताना हाळू चालवावी. डॉ.सचिन कुलकर्णी, अस्थिरोग


गाड्यांचा खुळखुळा झाला, नागरिकांची कंबर लचकली, तरीही प्रशासन नाही हलले

चारचाकी

नवीन :वेगळा पार्ट नाही.
बॉडी क्रॅक दुरुस्ती : 200 ते 1000 रु. नवीन : मिळत नाही.

स्प्रिंग लिफ मोडणे दुरुस्ती : नाही. नवीन : 10 ते 20 हजार

शॉकअँबसॉर्बर्स
दुरुस्ती : 200 ते 1000 रू. नवीन : 10,000 रु.

सस्पेन्शन पार्ट्स
दुरुस्ती : एक ते 2000 रु. नवीन : 10 ते 20 हजार

खड्डय़ांमुळे दुचाकी वाहनांत निर्माण होताहेत हे बिघाड
दुरुस्ती :400 ते 500 रु.

शॉकअँबसॉर्बर्स

नवीन :3000

दुरुस्ती :500 ते 600 रु.

सस्पेन्शन

नवीन :1000 ते 1200 रु.

दुरुस्ती :200 ते 250 रु.

चिमटा आऊट

नवीन :400 ते 500 रु.

दुरुस्ती : नाही

हॅडेल बॉल सेट

नवीन :180 ते 200 रु.

दुरुस्ती : नाही

चाकाचे बेरिंग

नवीन :1700

दुरुस्ती :400 ते 500 रु.

टायर , टयुब खराब
खड्डय़ातून वाहन गेल्यास वाहनांच्या अनेक पार्टची हानी होते. कोणता पार्ट खराब झाला आहे त्यावर दुरुस्तीचा खर्च अवलंबवून आहे. वर उल्लेख केलेले पार्ट जर निकामी झाले असतील तर याचा किमान दुरुस्तीचा खर्च 1500 ते 1600 रुपये येऊ शकतो. गाडी खोलावी लागली तर 6 ते 8 हजारांपर्यंत खर्च येऊ शकतो.
नागेंद्र बसवंती,
विशाल ऑटोमोबाइल्स (दुचाकी), सोलापूर