आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Road Signal Problem Central Home Minister

केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले सिग्नल सुरू करण्याचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील अकरा सिग्नल दिवे ताबडतोब सुरू करा, वाहतूक यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी सांगितले. पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांना वैयक्तिक सूचना दिल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

शहरातील अकरा सिग्नलपैकी दोन चौकातील दिवे सुरू आहेत. अन्य नऊ चौकातील दिवे चालू करण्यासाठी मागील बेचाळीस दिवसांपासून ‘दिव्य मराठी’ पाठपुरावा करीत आहे. शनिवारी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी र्शी. रासकर, र्शी. सावरीकर यांची बैठक घेऊन दिवे चालू करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. या अकरा दिव्यांशिवाय आणखी एकोणीस चौकात दिवे बसविता येतात का याची चाचपणी करण्यास सांगितले आहे. म्हणजे शहरातील तीस चौकात सिग्नल दिवे लागतील. डीपीडीसी (जिल्हा नियोजन समिती), महापालिका व शहरातील तीनही आमदार यांच्या निधीतून यासाठी दीड कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. सिग्नलबाबत केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांना विचारले असता, दिवे सुरू करण्यासाठी मी पोलिस तसेच महापालिका या दोन्ही आयुक्तांशी बोलतो, सूचना देतो. याशिवाय वाहतूक सुधारण्यासाठी सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले सिग्नल सुरू करण्याचे आदेश

पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांना केल्या सूचना; शहरातील वाहतूकही सुधारा

प्रतिनिधी । सोलापूर

शहरातील अकरा सिग्नल दिवे ताबडतोब सुरू करा, वाहतूक यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी सांगितले. पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांना वैयक्तिक सूचना दिल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

शहरातील अकरा सिग्नलपैकी दोन चौकातील दिवे सुरू आहेत. अन्य नऊ चौकातील दिवे चालू करण्यासाठी मागील बेचाळीस दिवसांपासून ‘दिव्य मराठी’ पाठपुरावा करीत आहे. शनिवारी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी र्शी. रासकर, र्शी. सावरीकर यांची बैठक घेऊन दिवे चालू करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. या अकरा दिव्यांशिवाय आणखी एकोणीस चौकात दिवे बसविता येतात का याची चाचपणी करण्यास सांगितले आहे. म्हणजे शहरातील तीस चौकात सिग्नल दिवे लागतील. डीपीडीसी (जिल्हा नियोजन समिती), महापालिका व शहरातील तीनही आमदार यांच्या निधीतून यासाठी दीड कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. सिग्नलबाबत केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांना विचारले असता, दिवे सुरू करण्यासाठी मी पोलिस तसेच महापालिका या दोन्ही आयुक्तांशी बोलतो, सूचना देतो. याशिवाय वाहतूक सुधारण्यासाठी सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अपघाताचे गांभीर्य नाही
सोलापूर शेजारील शहरांत चांगली सिग्नल यंत्रणा आहे. मात्र, सेालापूर आहे तेथेच आहे. लोकप्रतिनिधींना निवडून द्यायचे आणि सुरक्षेबाबत काहीच करायचे नाही. त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे तरुण मुलांचे अपघात होत आहेत. पोलिस, महापालिका अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी काही उपाय करणार का? रामण्णा वल्लाकाटी, नागरिक

नियम सर्वांना समान हवे
मुंबईत आठ-दहा वर्षे रिक्षा चालवली आहे. कधीही वाहतुकीची अडचण नाही. काही ठिकाणी पोलिस नसले तरी वाहतूक सुरळीत असायची. सोलापुरात सर्व सिग्नल जेव्हा चालू होतील तेव्हा नागरिकांना आपोआप शिस्त लागेल. एखाद दुसरा सिग्नल चालू करून नियमावर बोट दाखवू नये. प्रथम सिग्नल चालू करा नंतर कारवाई. महिबूब गुलजार, रिक्षाचालक

हद्दवाढ भागातही पोलिस नेमा
शहरातील सिग्नल चालू करण्यासाठी अधिकार्‍यांची इच्छाशक्ती दिसत नाही. हद्दवाढ भागातही वाहतूक वाढली असून पोलिस नेमावेत. महापालिका, वाहतूक पोलिस हे एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. ‘जनसेवा हीच ईशसेवा’ हे ब्रीद वाक्य आत्मसात करणारे अधिकारी हेच का? असा प्रश्न उपस्थित होतो. राजन शिंदे, नागरिक

बंद सिग्नलच कारणीभूत
वाहतूक व्यवस्था कोलमडण्याचे कारण म्हणजे बंद सिग्नल. जोपर्यंत सिग्नल सुरू होत नाहीत, तोपर्यंत जास्त वाहतूक असलेल्या चौकात वाहतूक पोलिस नेमा. दिवे नसलेल्या चौकात मॅन्युअल (हातवारे) द्वारे वाहतूक नियंत्रण करा.’’ सत्यम आडम, नागरिक