आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते होताहेत, दर्जाची बोंबच; साडेचार कोटींच्या 21 रस्त्यांची कामे सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. पण, रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारकडून मिळालेल्या पैशातून आणि महापालिकेच्या वॉर्ड विकासाच्या रकमेतून 21 रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च आहे. गावठाण भागातील काही अपवाद वगळता इतर भागात कामे सुरू आहेत. यानंतर राज्य सरकारच्या अनुदानातून 47 कामे होणार आहेत. त्यासाठी सुमारे दहा कोटी 22 लाख रुपयांचा खर्च आहे.

दहा कोटींची कामे होणार :राज्य सरकारकडून मिळणार्‍या दोन कोटी 22 लाख आणि आठ कोटी असे एकूण 10 कोटी 22 लाखांच्या रकमेतून 47 रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यासाठी महापालिकेने टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आहे. हद्दवाढ भागात ड्रेनेजची कामे सुरू असल्याने त्या ठिकाणची कामे थांबवण्यात आली आहेत.

अभियंता कार्यालयात नाही माहिती : 21 रस्त्यांची यापूर्वी कामे केव्हा झालेली आहेत. त्यावर किती खर्च झाला होता. याची विचारणा केली असता, याचे तपशील नसल्याचे नगरअभियंता कार्यालयाने सांगितले.

येथे सुरू आहेत कामे (रक्कम लाखामध्ये)
हमीद किराणा स्टोअर्स ते कुंटला टेक्स्टाईल (45), अशोक चौक ते साईबाबा चौक (30), मुळेगाव क्रॉस रोड ते पी. पी. पटेल कारखाना (15), विजयनगर ते बसवेश्वर नगर (7), शिवगंगा नगर ते अंबिका नगर (10), माशाळवस्ती (20), विजय प्रोव्हीजन ते सुहाना टी हाऊस (8), सुनील नगर ते समरा नगर (17), नागनाथ औद्योगिक सोसायटी (14), दत्ता सुरवसे घर ते कल्याण टॉवर (6), वांगी रोड ते इरण्णा वस्ती (15), लक्ष्मी चाळ ते थोबडेमळा (9), नितीन नगर ते एमआयडीसी मेहक स्टाईल (49), जुना कुमठा नाका ते आदर्श नगर (20), कलावती नगर ते बसवेश्वर हॉल (45), चाँदतारा मशीद ते डॉ. गायकवाड दवाखाना (16), पंचकट्टा ते विजापूर वेस (22), चौपाड सिटी पोस्ट ऑफिस ते मल्लिकार्जुन मंदिर (35), फूड प्लाझा ते सह्याद्री शॉपिंग सेंटर (24) आणि उर्दू शाळा कॉर्नर ते पोटफाडी चौक (31).

दर्जा न तपासताच दिली जातात बिले

अधिकारी तपासतात
4शहरात रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यापैकी 21 कामे पूर्ण होत आली असून, 47 कामे सुरू करण्यात येत आहे. रस्त्याचा मक्ता दिल्यानंतर काम पूर्ण झाल्यावर महापालिका अधिकार्‍यांकडून वारंवार पाहणी आणि तपासणी केली जाते. त्यानंतर काम पूर्ण झाल्याचा दाखला दिला जातो.’’ सुभाष सावस्कर, नगर अभियंता

दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
कामाचे स्वरूप व दर्जा न तपासताच बिले दिली जात असल्याची शंका वाटावी अशी स्थिती आहे. नळ, ड्रेनेज कामाच्या दुरुस्तीसाठी वारंवार खड्डे खोदले जातात. सरस्वती चौक, रामलाल चौक दरम्यान ड्रेनेज कामासाठी खड्डा खणण्यात आला. रस्त्याचे काम करण्यापूर्वी ड्रेनेजचे काम का केले जात नाही? प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

नियम धाब्यावर
रस्ता केव्हा बांधला, बांधणीची पद्धत तपासली पाहिजे, असे नियमात म्हटले आहे. सध्या सुरू असलेले 21 रस्ते कधी बांधले किंवा शेवटची दुरुस्ती कधी केली, किती खर्च आला याची माहिती महापालिकेच्या अभियंता कार्यालयाकडून मिळू शकली नाही.