आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरचे रोहन पोरे यांना कान्स लायन्स पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आंतरराष्ट्रीय पातळीवरील जुलै महिन्यात झालेल्या फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जाहिरात महोत्सवात सोलापूरचे युवा चित्रकार रोहन पोरे यांना कान्स लायन्स पुरस्कार मिळाला. स्टीक इट आर्ट या रेखाचित्रावर अधारित कॅम्पेनला तीन विभागांतील नामांकनासह ‘ग्राफिक डिझाइन व इलेस्ट्रेशन ग्राफ या विभागातील दोन कांस्य पदके मिळाली.

मुंबईतील आघाडीच्या बीबीडीओ इंडिया या नामांकित संस्थेमार्फत पल्बिक अँवेरनेस कॅम्पेनसाठी रोहनने एकूण 10 चित्रे तयार केली होती. त्यासाठी हा पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कान्स (फ्रान्स) येथे दरवर्षी महिनाभर जाहिरात महोत्सव आयोजित केला जातो. यावेळी तो जुलैमध्ये झाला. बीबीडीओ इंडिया या संस्थेने रोहनची प्रवेशिका पाठविली होती. रोहनने मुंबईतील जाहिरात व डिझाइन क्षेत्रात मुक्त चित्रकार म्हणून पाऊल टाकले असून अनेक प्रसिध्द जाहिरात संस्थांसाठी तो काम करत आहे. मुखपृष्ठांबरोबर अनेक नामांकित दिवाणखान्यात रोहनची व्यक्तिचित्रे आहेत. सतत चार वर्षे रोहनला पुण्याचा ‘टॅग’ पुरस्कार मिळाला आहे.


हा पुरस्कार मला मोलाचा वाटतो. सध्याच्या युगात 65 वी कला ठरलेल्या जाहिरात क्षेत्रात युवकांना खूप वाव आहे. ही वाट पत्करल्यास उज्‍जवल भविष्य लाभू शकते, हे या पुरस्काराने दाखवून दिले आहे.’’ रोहन पोरे, चित्रकार, सोलापूर.