आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

25 रिक्षा स्क्रॅप: दंड वसुलीत सोलापूर आरटीओ राज्यात अव्वल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विशेष पथकाने गुरुवारी सायंकाळी पुन्हा बेकायदा रिक्षांवर कारवाई केली. यात 25 रिक्षा चालकांना दंड करण्यात आला. खासगी, स्कॅ्प, विनापरवाना रस्त्यांवर धावणार्‍या रिक्षांचा समावेश आहे. तुळजापूर रस्ता, अक्कलकोट रस्ता आदी भागांत कारवाई झाली. मागील दोन दिवसांत ‘आरटीओ’च्या विशेष पथकाने 50 रिक्षांवर कारवाई केली आहे.

सोलापूर उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दंडाद्वारे मिळालेला महसूल 13 लाख आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत एकूण केलेल्या कारवाईतील तो आकडा आहे. यात एकूण 880 हून अधिक रिक्षांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. पुणे आरटीओचा रिक्षा कारवाईत 88 हजारांचा महसूल मिळवून दुसरा क्रमांक आहे.

कारवाई करणारे पथक
मोटार वाहन निरीक्षक राजेंद्र पाटोळे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. यात साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अतुल नांदगावकर, योगेश खैरनार, रोहन पाडकर, राजीव नागरे, जयर्शी जिने, प्रमोद महाडिक आदींचा समावेश आहे.