आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओचा ‘कार-नामा’ एकच नंबर दोन गाड्यांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कधी काय करेल याचा नेम नाही. एजंटनामक हस्तकास घेतल्याविना येथे काम होणे अशक्यच. परंतु रीतसर व्हीआयपी क्रमांकासाठी शुल्क भरूनही दोन वेगवेगळ्या चारचाकी वाहनांना एकच नंबर देण्याचा पराक्रम या विभागाने देऊन येथे सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडवले आहे. एमएच 13 एझेड 8080 हा एकच नंबर दोन वाहनधारकांना देण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षापासून ही वाहने धावत आहेत.
कागदपत्रे तपासून निर्णय
वाहनधारक अथवा शोरूमवाल्याने अर्धवट पेपर दिल्यामुळे हा प्रकार घडला असावा. गाडीचे पेपर जर अर्धवट असतील तर गाडीचा क्रमांक संबंधित वाहनधारकांच्या नावाने नोंदविला जात नाही. गुडपल्ली यांनी प्रथम मॅन्युअली पद्धतीने पैसे भरले असतील तर त्याची नोंद संगणकात करून घेणे आवश्यक होते. दोन्ही गाड्यांची कागदपत्रे तपासून योग्य निर्णय घेण्यात येईल.’’
दीपक पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
आरटीओकडे पैसे भरल्यानंतर तो क्रमांक ब्लॉक केला होता. तरीही हा क्रमांक आरटीओने दुसर्‍या कार कसा देण्यात आला, याची चौकशी झाली पाहिजे.’’
अभय गुडपल्ली, कारचालक
आश्चर्य वाटले
दोन क्रमांकाच्या प्रकाराने आम्ही आश्चर्यचकि त झालो आहोत. या संदर्भात माझा भाऊ नागेशशी चर्चा करून ही बाब आरटीओ कार्यालयातील अधिकार्‍यांना कळवणार आहे.’’ प्रफुल्ल गवसाने, नागेश गवसाने यांचे बंधू.
असे घडले नंबरचे नाट्य
सोलापुरातील अभय गुडपल्ली यांना कारसाठी 8080 हाच व्हीआयपी क्रमांक हवा होता. त्यांनी 16 मार्च 2012 रोजी चॉइस नंबरसाठी 7500 रुपये शुल्क भरले. गाडी मिळाल्यानंतर 21 मार्च 2012 रोजी त्यांना हा क्रमांक देण्यात आला. तशी पावतीही त्यांना देण्यात आली. नंबर वाहनधारकाला दिल्यानंतर तो क्रमांक आरटीओ ब्लॉक करते. मात्र, ब्लॉक केलेला हा क्रमांक पुन्हा वैराग येथील नागेश गवसाने यांना दिला. गवसाने यांनी या क्रमांकासाठी 26 मार्च 2012 मध्ये आरटीओकडे पैसे भरले व त्याच दिवशी त्यांना हा क्रमांक देण्यात आला.पहिल्यांदा पैसे भरणार्‍याला नियमानुसार नंबर देऊन गाडीचे रजिस्ट्रेशन करण्यात येते. मात्र याठिकाणी उलटे घडले. गुडपल्ली यांनी प्रथम पैसे भरले असले तरीही त्यांना हा क्रमांक न देता गवसाने यांना देण्यात आला. आरटीओच्या या अजब कारभारामुळे गुडपल्ली यांची स्वीफ्ट तर गवसाने यांची स्कॉपिओ एकाच क्रमांकाने धावत आहेत.