आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातरस्ता चौकाचे बदलणार रूप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सातरस्ता चौकातील आयलॅन्ड, यशवंतराव चव्हाण पुतळा परिसर, संगमेश्वर महाविद्यालय ते जुन एम्प्लॉयमेंट चौक मार्गावरील दुभाजक आदी सुशोभीकरण आणि देखभालीसाठी ‘दिव्य मराठी’ने दत्तक घेतले आहे. त्याच्या कामाची सुरुवात उपमहापौर हारून सय्यद यांच्या हस्ते सोमवारी झाली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून शहरात सुमारे 91 कोटी रुपयांच्या रस्ते विकासाचे काम आठ ते दहा वर्षांपूर्वी झाले. शहरातील काही चौक सुशोभिकरण करण्यात आले, त्यात सातरस्ता चौकाचाही समावेश होता.
असे सजणार चौक
वृक्षारोपण तर होणारच असून, मुख्य आयलॅन्डमध्ये पृथ्वीची प्रतिकृती बसवण्यात येणार आहे. त्याबरोबरच आयलॅन्ड, दुभाजक, यशवंतराव चव्हाण पुतळा परिसरातील लोखंडी ग्रीलला रंगकाम करण्यात येणार आहे. रंगकाम सुवर्णा कांबळे या करणार आहेत. सुशोभिकरणाचे काम वास्तु क्रिएशनचे शरद सातलगावकर करणार आहेत. दुभाजकांमध्ये वृक्षारोपणाचे काम लक्ष्मण किणीकर हे करणार आहेत. एक महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण होणार आहे. देखभालीसाठी ‘दिव्य मराठी’कडून दोन माळी ठेवण्यात येणार आहेत.
‘दिव्य मराठी’चे कौतुक
‘दिव्य मराठी’ने राबविलेल्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. महापालिका आयुक्त अजय सावरीकर, पोलिस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार, नगरसेवक दिलीप कोल्हे, मंड्या व उद्यान विभाग सभापती सुनीता रोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी साहाय्यक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, महापालिकेचे साहाय्यक आयुक्त अनिल विपत, नगर अभियंता सुभाष सावस्कर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, अरुण वायकर, निवासी संपादक संजीव पिंपरकर, शाखा प्रमुख टिंकेश ग्यमलानी, सीएसआरचे साहाय्यक व्यवस्थापक दिलीप शर्मा, रमेश खाडे आदी उपस्थित होते.

सुशोभीकरणास पुढाकार
एमएसआरडीसीने सुशोभित केलेल्या सातरस्ता चौकाची देखभाल होऊ शकली नाही. शुभेच्छांच्या फलकांची येथे गर्दी होऊ लागली. आयलॅन्डमध्येही वाढदिवसाच्या जाहिरातीचे फलक उभारले जाऊ लागले. सातरस्ता चौक या शहराच्या महत्त्वाच्या भागाचे सुशोभीकरण करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेतला आहे.

देखभालही होणार
सातरस्ता चौकातील आयलॅन्ड, यशवंतराव चव्हाण पुतळा परिसर, त्यासमोरील त्रिकोणी आयलॅन्ड, संगमेश्वर महाविद्यालय ते जुना एम्प्लॉयमेंट चौक मार्गावरील दुभाजक, सातरस्ता चौकातील दुभाजक आदींचे ‘दिव्य मराठी’कडून सुशोभीकरण व देखभाल होणार होणार आहे.