आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Solapur Sahil It Became' Kepecino 'of Musicians

सोलापूरचा साहिल बनला ‘कॅपेचिनो’चा संगीतकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शास्त्रीय संगीताचे धडे ना सुगम संगीताचा स्पर्श. केवळ संगीतावरील अतूट प्रेमातून सोलापूरचा साहिल कुलकर्णी हा तरुण मराठी चित्रपट कॅपेचिनोचा संगीतकार बनण्यापर्यंत मजल मारलाय. एका सामान्य कुटुंबातल्या चंदेरी दुनियेचे स्वप्न पाहणार्‍या तरुणाला जिद्दीच्या बळावर यशस्वी होता येते, हे यातून सिद्ध झाले आहे. साहिलने गायक म्हणून या चित्रपटात गीतही गायिले आहे.

सोलापूरच्या अंत्रोळीकर नगरमध्ये राहणारा साहील हा हरिभाई देवकरण प्रशालेचा विद्यार्थी. शाळेत असल्यापासूनच त्याला संगीताचे वेड. बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्याने थेट पुणे गाठले. तिथे त्याने रॉक बँड नावाचा संगीताचा ग्रुप तयार केला. संगीताचे अनेक प्रयोग केले. त्या प्रयोगानेच त्याला शिवदर्शन या दिग्दर्शकाने संगीत कंपोझ क रण्याची संधी दिली

संधीचे सोने करण्याचा प्रयत्न
मला ही संधी शिवदर्शन कदम व निर्माते संतोष देशपांडे यांच्यामुळेच मिळाली. माझ्यासारख्या नवख्या मुलाला ही संधी दिली. माझे वय केवळ 21 आहे. अनेक दिग्गज असतानाही त्यांनी मला या कामाला लायक समजले. आई बाबा यांच्या आशीर्वादाने मी हे करू शकलो. त्याचा आनंद आहे. सोलापूरच्या लोकांनी हा चित्रपट पाहावा. त्यातील माझे गीत ऐकावे ही आशा आहे. साहिल अजित कुलकर्णी, संगीतकार

अशी मिळाली संधी
साहिलच्या एका प्रयोगाला पुण्याचे दिग्दर्शक शिवदर्शन कदम हे आले होते. साहिलच्या मृत्युंजय रॉक बँडने सादर केलेल्या प्रयोगाचा उत्साह त्यांना भावला. त्यामुळे त्यांनी साहिलला संधी दिली.
चित्रपटातील कलावंत : जितेंद्र जोशी, अनुजा गोखले हे मुख्य भूमिकेत आहेत. संजय नार्वेकर, मोहन जोशी, मानसी नाईक, विजू खोटे, वर्षा उसगावकर, गिरीश ओक हे कलावंत आहेत.

टॅलेंटचे कौतुक केले
मी साहिलसारख्या नव्या संगीतकाराला संधी दिली. त्याच्या टॅलेंटचे कौतुक केले. नवी कलाकृती साकारण्याचे कसब आताच्या मुलांमध्ये आहे. त्यांना संधी दिल्याने ते उत्साहाने काही तरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करतात. शिवदर्शन कदम, दिग्दर्शक