आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी तलाव मासेमारीचा मक्ता ८५ हजारांवरून २१ लाखांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विजापूर रस्त्यावरील धर्मवीर संभाजी तलावातील मासेमारीचा मक्ता यापूर्वी इच्छा भगवंताची या संस्थेस दरवर्षी ८५ हजार या प्रमाणे पाच वर्षांसाठी देण्यात आला होता. पण तो मक्ता महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी रद्द करून नव्याने काढला.
कुमार जाधव या मक्तेदाराने मासेमारीसाठी दरवर्षी २१ लाखांचा मक्ता देण्याची तयारी दर्शवली आणि तसे टेंडरही भरले. यामुळे दरवर्षी महापालिकेला २०.१५ लाखांचा फायदा होणार आहे.
संभाजी तलावाचा मक्ता पाच वर्षासाठी इच्छा भगवंताची या संस्थेला देण्यात आला होता. तसा ठराव स्थायी समितीने यापूर्वी केला होता. तो ठराव विखंडित करून नव्याने मक्ता काढण्याचे आदेश आयुक्त गुडेवार यांनी केला असता, मक्तेदाराने न्यायालयात धाव घेतली. इच्छा भगवंताची ही संस्था पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या एका माजी नगरसेवकाच्या जवळचा आहे.
न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे इच्छा भगवंताची या संस्थेचा मक्ता गुडेवार यांनी रद्द करून नव्याने काढला. यात तीन मक्तेदार आले. त्यात अनुक्रमे दरवर्षी २१, १८ आणि १६ लाखांना मक्ता घेण्याची तयारी तिघांनी दर्शवली. कुमार जाधव यांचा मक्ता सर्वाधिक २१ लाखांचा आहे. यामुळे महापालिकेचे दरवर्षी २०.१५ लाख असे पाच वर्षांसाठी सुमारे दीड कोटीचा मनपाचा फायदा होणार आहे, असे आयुक्त गुडेवार यांनी सांगितले.