आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur, Sat Rasta Circle Decoration Bye Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘दिव्य मराठी’कडून सात रस्ता सर्कल सुशोभीकरणाचे लोकार्पण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सात रस्त्यावरील आयलॅण्ड आणि दुभाजकांमध्ये रोपे लावून ‘दिव्य मराठी’ने सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी सायंकाळी मोठय़ा उत्साहात झाला. आयलॅण्डच्या रचनेत कुठलाच बदल न करता, त्यावरील हिरवाई वाढवण्यासाठी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली आहेत. शोभा वाढवणारी रंगरंगोटी, पाना-फुलांची आकर्षक चित्रे, समोरील दुभाजकांमध्ये लावलेल्या रोपांच्या संरक्षणासाठी शेडनेट लावण्यात आली. त्याला नित्य पाणी देण्याचे नियोजन केले.
संगमेश्वर महाविद्यालयासमोरील दुभाजकांमध्येही रोपे लावण्यात आली. काळी माती, खत पुरवण्यात आले. पावसाच्या सरी झेलत रोपेही डोलत आहेत.
पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या वेळी माजी खासदार सुभाष देशमुख, नगरसेविका फिरदोस पटेल, परवीन इनामदार, शौकत पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक संजीव पिंपरकर, स्टेट हेड (बिझनेस) निशित जैन, युनिट हेड टिंकेश ग्यामलानी यांनी स्वागत केले. महापौर, आयुक्तांसह सभागृहनेते, विरोधी पक्षनेत्या, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते यांनी सुशोभीकरणाची पाहणी केली.