आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंधळामुळे पदोन्नती रखडली; जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे समुपदेशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या आरक्षणातील गोंधळामुळे प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नती रखडल्या. 60 जागांची पदोन्नती झाली तर आरक्षणाच्या 10 जागांचा निर्णय राखून ठेवला आहे. आरक्षणाच्या रोस्टरमध्ये मागासवर्गीयांच्या 17 जागा आहेत. मात्र, त्यामध्ये 25 जागा होत्या. शिक्षक संघटनांनी निदर्शनास आणून दिल्याने पदोन्नती प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंत खोळंबली.

जिल्ह्यातील 97 केंद्रप्रमुख पदांसाठी सेवाज्येष्ठतेने 400 प्राथमिक शिक्षकांना रविवारी सेवासदन प्रशालेत सकाळी साडेदहा वाजता समुपदेशनासाठी बोलावण्यात आले होते. जिल्ह्यातील गुणवत्ता वाढवण्यासाठी रिक्त असलेली विविध पदे भरण्यात यावी, अशी मागणी यापूर्वी शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात शिक्षणविस्तार अधिकार्‍यांच्या 22 पदासाठी समुपदेशन घेण्यात आले.
प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीची संख्या जास्त असल्याने रविवारी फक्त 70 जागांसाठी पदोन्नती करण्याचा निर्णय शिक्षणाधिकारी बाबर यांनी घेतला. मात्र, शिक्षक संघटनांनी या प्रक्रियेला विरोध केला. त्यानंतर शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर, उपशिक्षणाधिकारी जितेंद्र खंडागळे आणि बहुजन मागासवर्गीय संघटनेमध्ये बैठक झाली. त्यानंतर फक्त 60 जणांच्या पदोन्नतीची मान्यता देण्यात आली.