आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर सेतू केंद्रातील गर्दीपुढे यंत्रणा तोकडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या व कर्मचार्‍यांच्या संपामुळे विविध प्रकारच्या दाखल्यांचे ढिगारे जिल्हाधिकारी कार्यालयात सह्यांच्या प्रतीक्षेत आहेत. अवघ्या काही दिवसांत साडेचार हजार दाखल्यांवर सह्या करण्याचा विक्रम केला असला तरी नागरिकांचे हेलपाटे काही कमी होत नाहीत.

तलाठी, जलसंपदा खात्यांमधील विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाल्याने विविध दाखल्यांसाठी सेतू सुविधा केंद्रात नागरिकांची पुन्हा झुंबड उडाली असून यंत्रणा तोकडी पडत आहे. उत्पन्नाचे दाखले नागरिकांना मिळाले. पण जातीचे दाखले व नॉन क्रिमिलियर दाखले मिळाले नसल्याने नागरिक संतापले आहेत. गेल्या महिना-पंधरा दिवसांपासून जातीच्या दाखल्यांसाठी हेलपाटे मारून वैतागलेल्या काही नागरिकांची सोमवारी दुपारी सेतू कार्यालयातील कर्मचार्‍यांबरोबर वादावादी झाली.

जातीच्या दाखल्यांची पडताळणी करून पूर्वी उपजिल्हाधिकारी सह्या करीत होते. पण काही उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या झाल्यामुळे प्रांताधिकार्‍यांकडे त्याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली. नतून प्रांताधिकार्‍यांनी जातीच्या दाखल्यांची सूक्ष्म पडताळणी सुरू केली असून त्रुटी आढळलेले दाखले परत पाठविले. तसेच, दाखल्यांची संख्या जास्त असल्याने त्यांची पडताळणी करून देण्यास विलंब होत आहे. त्याचा फटका नागरिकांना बसतोय.

485 नवे प्रस्ताव सादर
सोमवारी सेतू केंद्रातून विविध प्रकारचे तब्बल 700 दाखले देण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक उत्पन्नाचे 602, रहिवासी 57, नॉनक्रिमिलिअर 22 व जातीच्या 50 दाखल्यांचा समावेश होता. दाखले मिळवण्यासाठी 485 प्रस्ताव दाखल झाले.

जातीच्या दाखल्यांना मागणी
उत्पन्नाचे दाखले पडून नाहीत. जातीच्या दाखल्यांची मागणी जास्त आहे. ते दाखले संबंधित अधिकार्‍यांकडे सह्यांसाठी पाठविले असून ते मिळताच तातडीने वाटप होतील. सेतूमध्ये येणारे सर्व दरवाजे कुलूपबंद केलेत. ओळखपत्रांचा वापर सक्तीचा केला आहे.
-रणजितसिंह ठाकूर, सेतू संचालक