आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर-पुणे महामार्गावर शेळगी येथील उड्डाणपुलाचे काम करताना येथे टाकण्यात येणार्‍या नाल्याच्या पाइपलाइनची जोडणी व्यवस्थित करण्यात आली नसल्यामुळे गुरुवारी झालेल्या पावसाने भवानी पेठ परिसरातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. संपूर्ण रात्न येथील नागरिकांना पाणी काढण्यातच जागून काढावी लागली.

सोलापूर-पुणे महामार्गावर चार पदरीकरणाचे काम जोरात सुरू असून, या कामामुळे या रस्त्याची उंची वाढली आहे. या रस्त्यावर शेळगी परिसरात नैसर्गिक नाला आहे. यापूर्वी जोरदार पाऊस आला की, हा नाला भरून वाहत होता. चौपदरीकरण तसेच येथील उड्डानपुलाचे काम सुरू झाल्यानंतर हा खुला नाला बंद करून पाणी जाण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली. आणि नाल्यातील पाण्याला वाट देण्याचा प्रय} करण्यात आला. मात्न, ती पाइपलाइन पुढे नेत असताना तेथे काही घरे आली. याबाबत निर्माण झालेल्या अडचणीची कल्पना जिल्हाधिकारी कार्यालयातील सिटी सर्व्हे विभागाला कळवण्यात आली. मात्न त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पाण्याचा प्रवाह पुढे जाण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पाइपलाइन टाकण्यात आली होती. गुरुवारी झालेल्या पहिल्याच पावसाचे पाणी पाइपलाइनमधून येऊन नागरिकांच्या घरात शिरले.

या वेळी नगरसेवक अविनाश पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी उमेश झगडे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी पाणी दाखवून दिले. र्शी. झगडे यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पाइपलाइन मधील माती काढून पाइपचे काम मजबूत करण्याचे आदेश दिले.

ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यास प्राधान्य द्यावे
दरवर्षी पावसाळ्यात नाल्यातील पाणी आमच्या घरात शिरते. गेल्या वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याचे काम करताना पाइपलाइन व्यवस्थित न टाकल्याने पाणी येथील नागरिकांच्या घरात शिरत आहे.पावसाळ्या पुरता विचार न करता या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज आहे.’’ विद्युलता शिंदे, नागरिक

नाल्याच्या पाण्यामुळे आरोग्यास धोका
पावसाळ्यात नाल्यातील पाणी येऊन आमच्या परिसरातील सर्व रस्ते बंद होतात. घराबाहेर पाण्याचे तळे साचलेले दिसते. मुले पाण्यात पडण्याची भीती असते. पाणी साचल्याने दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे.’’ सुमन पवार, नागरिक

काम मजबूत केले जाईल
नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्वीच करण्यात आले होते. पाइपलाइनमध्ये साचलेली माती काढून काम मजबूत करण्यात येईल. तसेच पाइपलाइन सरळ टाकत असताना काही घरे मधे आली आणि काम थांबले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सिटी सर्व्हे विभागातील अधिकार्‍यांनी आम्हाला थोडेसुद्धा सहकार्य केले नाही.’’ उमेश झगडे, अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग