आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण मंडळाला समाजपुरुषांचा विसर; शाळांना राजकीय नेत्यांची नावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळा या क्रमांकाने ओळखल्या जात होत्या. आता त्यांचे नामकरण करण्यात आले आहे. ते करताना शिक्षण मंडळाला थोर समाजपुरुष, महात्मे, हुतात्मे यांचा विसर पडला आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांची नावे मात्र आवर्जुन दिली आहेत. हिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे ब्रिटिशांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करणार्‍या सावित्रीबाई फुले यांचा विसर पडला आहे. यांच्या बाजूने दबाव आणणारी राजकीय मंडळी नसल्याने त्यांचा विसर पडला की काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. 65 शाळांना नाव देण्याचा प्रस्ताव एकमताने मंडळाच्या सभेत सोमवारी मंजूर झाला. यात चार हुतात्म्यांपैकी तीन हुतात्म्यांची नावे देण्यात आली. मात्र, किसन सारडा यांचे नाव देण्यासाठी शाळाच उरली नाही.
विविध माध्यमांच्या शाळांचे नामकरण झाले असे ..
उर्दू माध्यम शाळा
मुलांची केंद्र क्रमांक 1 : शहीद अशफाकुल्लाह खान, मुलांची केंद्र 5 : मौलाना अब्दुलकलाम आझाद, मुलांची क्रमांक 6 : बद्रुद्दीन तय्यबजी, मुलांची क्रमांक 7 : शहीद मोहसीन शेख, मुलांची क्रमांक 8 : डॉ. अल्लामा इक्बाल, मुलांची क्रमांक 9 : मिर्झा गालीब, मुलांची कॅम्प शाळा : सर सय्यद महंमद खान, मुलांची शाळा हेडक्वार्टर : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, कुर्बान हुसेननगर शाळा : हुतात्मा कुर्बान हुसेन, मुलांची शाळा रामवाडी : फक्रुद्दीन अलीअहमद, उर्दू गहझो 3 : चाँदतारा, रूबीनगर शाळा : खान अब्दुल गफार खान, चिरागअली नगर : चिरागअली, संगमेश्वरनगर शाळा : मौलाना महमद अली
मुलींची शाळा क्रमांक 2 : शहीद टिपू सुलतान, क्रमांक 3 : रफी महमद किडवाई, क्रमांक 3 : बेगम हसरत मोहानी, क्रमांक 5 : अरुणा असिफअली, सेंट्रल : रझिया सुलताना, मुलींची कॅम्प शाळा : झुलेखा बेगम आझाद
मराठी माध्यम शाळा
मुलांची शाळा क्रमांक 2 : स्वामी विवेकानंद, क्रमांक 3 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रमांक 4 : महर्षी वाल्मीकी, क्रमांक 6 : छत्रपती शिवाजी महाराज, मुलांची शाळा क्रमांक 9 : महाराणा प्रताप, क्रमांक 10 : कै. पद्मावती सोमशेट्टी, क्रमांक 11 : सुभेदार रामजी आंबेडकर, क्रमांक 12 : शामाप्रसाद मुखर्जी, क्रमांक 13 : शहीद अशोक कामटे, क्रमांक 19 : संत कक्कय्या महाराज. क्रमांक 24 : छत्रपती संभाजी महाराज, क्रमांक 25 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रमांक 26 : हुतात्मा विठ्ठलराव कोतवाल, क्रमांक 27 : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, क्रमांक 28 : संत रोहिदास, रामवाडी : राजीव गांधी, क्रमांक 29 : महात्मा बसवेश्वर, क्रमांक 30 : रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील, कॅम्प : मातोर्शी संकुबाई शिंदे, केंद्र : वि. दा. सावरकर, मोदी : यशवंतराव चव्हाण, देशमुख वस्ती (गंगाराम देशमुख), रिमांडहोम : रा. स. चंडक.
मुलींची केंद्र शाळा 3 : हुतात्मा मलप्पा धनशेट्टी, क्रमांक 5 : शरण शिवलिंगेश्वर, क्रमांक 6 : संत तुकाराम, क्रमांक 8 : हुतात्मा जगन्नाथ शिंदे, क्रमांक 12 : राणी लक्ष्मीबाई, क्रमांक 16 : रमाबाई आंबेडकर, क्रमांक 19 : वीर राणी पद्मावती, पांढरेवस्ती : महात्मा जोतिबा फुले, भागशाळा विनायक नगर : द्वारकाबाई साहेबराव कांबळे, कॅम्प : इंदिरा गांधी
तीन हुतात्म्यांची नावे दिली, सारडांचे काय?
स्वातंत्र्यासाठी चार हुतात्म्यांनी कुर्बानी दिली. शहरातील तीन हुतात्म्यांची नावे महापालिका शाळांना देण्यात आली. पण किसन सारडा या चौथ्या हुतात्म्याचे नाव कोणत्याही शाळेस दिले नाही. त्यांचे नाव देण्यास काय हरकत होती. यात राजकारण झाल्याचे दिसते. आम्ही मारवाडी समाजाच्या वतीने महापालिका शिक्षण मंडळाचा निषेध करत आहोत.
-श्रीनिवास दायमा, मारवाडी युवा मंच, संस्थापक सदस्य
कन्नड माध्यम
मुलांची शाळा क्रमांक 1 : अप्पासाहेब वारद, क्रमांक 3 : वीरराणी कित्तुर चन्नम्मा, कन्नड शाळा : हुतात्मा भगतसिंग, क्रमांक 21 : राजर्षी शाहू महाराज, मुलींची शाळा वारदमड्डी : अक्कमहादेवी. रेवणसिद्धेवर व भुवनेश्वरी कन्नड शाळांची नावे तीच ठेवली आहेत.
तेलुगु माध्यम
मुलांची क्रमांक 2 : पोट्टी र्शीरामुलू, क्रमांक 1 : श्रीकृष्ण देवराय, क्रमांक 3 : गिडगू व्यंकट राममूर्ती, क्रमांक 4 : भावना ऋषी, सुनीलनगर : रंगनाथन
मोहिते-पाटील नाव देणार नाही
तीन शाळांचे नाव प्रलंबित आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, किसन सारडा यांचे नाव देण्यात येणार आहे. रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांचे नाव देण्याचे रद्द करण्यात येईल.
- प्रा. व्यंकटेश कटके, सभापती, मनपा शिक्षण मंडळ