आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा शॉपिंग सेंटरमधील पोटभाडेकरूंच्या १८ गाळ्यांना ठोकले सील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मनपा शॉपिंग सेंटरमधील ३४२ गाळ्यांतील पोटभाडेकरूंकडील गाळे ताब्यात घेण्याची मोहीम मनपाने हाती घेतली असून शुक्रवारी रामवाडी येथील आठ, वाडिया हॉस्पिटल परिसरातील तीन आणि महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयासमोरील सात गाळ्यांवर कारवाई करत त्यांना सील ठोकण्यात आले. यापुढेही कारवाई मोहीम सुरू असेल, असे मनपा भूमी मालमत्ता अधीक्षक सारिका आकुलवार यांनी सांगितले.]

महापालिकेच्या १४४९ गाळ्यांपैकी १४४६ गाळ्यांची मुदत संपली आहे. या गाळ्यांसाठी नवीन रेडिरेकनरनुसार भाडेवाढ करून जून २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने करार करण्यात येणार आहे. सध्या मनपाच्या गाळ्यात ३४२ पोटभाडेकरू आहेत. त्या पोटभाडेकरूंकडील गाळे ताब्यात घेण्यात येत आहेत.

याठिकाणी झाली कारवाई (कंसातस्थळ पोटभाडेकरूंचे नाव )
रामवाडी- गाळा क्रमांक १- शिवाजी अंबादास गायकवाड, गाळा क्रमांक १३ -विशाल शिवाजी गायकवाड (बाबूलाल शेख), गाळा क्रमांक २३ -सुंदरलाल व्यंकटेश कटारे (डाॅ. सय्यद), भिमराव शिवप्पा बाळगे (इब्राहिम शेख), गाळा क्रमांक १९ -नागनाथ सिद्राम गायकवाड (फक्रोद्दीन शेख), गाळा क्रमांक २९- खाजा काझी (शिंदे), गाळा क्रमांक ३० -चांॅदपाशा हुसेनसाब शेख (नागनाथ पवार).
वाडिया हॉस्पिटल - गाळा क्रमांक -हरिभाऊ नागनाथ चौधरी (शेख), गाळा क्रमांक -हरिभाई दर्शनगवळी (शेख), गाळा क्रमांक २० -सना काशीम यादगिरी (महिबूब शेख).

मेजर शॉपिंग सेंटरवर कारवाई
^पोटभाडेकरूंकडील गाळे ताब्यात घेऊन गाळ्यांना सील करण्याची कारवाई सुरू आहे. मेजर शॉपिंग सेंटरवर आमचे लक्ष आहे. अमितादगडे, सहाय्यकआयुक्त