सोलापूर - महापालिकेच्यागाळ्यांचा भाडे लिलाव रोखण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी शहर बंद करून मूकमोर्चा काढण्याचा निर्णय गुरुवारी शिवस्मारक येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाला चेंबर ऑफ कॉमर्सने पाठिंबा दिला. त्यासाठी शुक्रवारी सर्व व्यापा-यांची बैठक बोलवण्यात आल्याची माहिती प्रभाकर वनकुद्रे यांनी दिली.
मनपाच्या ६०१ मेजर गाळ्यांचा लिलाव महापालिकेने सुरू केला आहे. या निर्णयाला शहरातील व्यापारी विरोध करीत आहेत. त्यासाठी आंदोलन करण्याची तयारी व्यापा-यांनी दर्शविली आहे.
याबाबत गुरुवारी शिवस्मारक सभागृहात संघर्ष समिती बैठक झाली. या वेळी समितीचे अशोक मुळीक यांनी शनिवारी बंद आणि मूकमोर्चा काढण्याची घोषणा केली. याबाबत गरज पडल्यास न्यायालयात जाऊ. व्यापा-यांनी निविदा भरली तर हक्क सोडल्यासारखे होईल त्यामुळे कोणी निविदा भरू नये, असेही त्यांनी सांगितले.
दीपक मुनोत म्हणाले, गाळ्यांचा लिलाव ही महापालिका आयुक्तांची मनमानी आहे. ते शहरातील १४०० गाळेधारकांना वेठीस धरत आहेत. अनिल पल्ली म्हणाले, आमचे ऐकले नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल. कोणावर अन्याय होणार नाही, समिती सांगेल तेच होईल. या वेळी सुमारे ५०० व्यापारी उपस्थित होते. याप्रसंगी कमरून्निसा शेख, नगरसेवक शिवा बाटलीवाला, नागेश वल्याळ यांनी मत व्यक्त केले.
पोटभाडेकरू वर कारवाई करा
नगरसेवकशेलैंद्र आमणगी यांनी आयुक्तांच्या भूमिकेवर टीका केली. आयुक्त हट्टी आहेत. त्यांनी मुंबईत,"मी पुढे गेलोय आता माघार नाही'' अशी भूमिका घेतली. गाळ्यात पोटभाडेकरू असेल तर कारवाई होत नसल्याचे अमणगी म्हणाले.
व्यापारी संघर्ष समितीच्या बैठकीत बोलताना उपमहापौर प्रवीण डोंगरे.
ही शोकांतिकाच
*आम्हीमहापालिकेत असूनही याबद्दल काहीच करू शकत नाही, ही शोकांतिका आहे. व्यापारी भाड्यासाठी तडजोड करण्यास तयार आहेत. आयुक्तांनी कारवाई थांबवावी. न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. बाबामिस्त्री, मनपा स्थायी समिती सभापती
सूडभावनेने कारवाई
*महापालिकाआयुक्त हुकूमशाही आणि हट्टीपणाने वागत आहेत. सूडभावनेने कारवाई करत आहेत. त्यांच्या कामात कृतीत फरक आहे. आम्ही व्यापा-यांच्या पाठीशी आहोत. वेळप्रसंगी हातात दगड घ्यावे लागतील. अमोलशिंदे, माजी नगरसेवक