आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिग्नलसंदर्भात डीपीसीच्या संवेदनशीलतेची कसोटी; जीवित हानी टाळण्यासाठी हवे वाहतूक नियंत्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वाढते अपघात व नागरी वाहतुकीची गंभीर समस्या लक्षात घेऊन शहरात नवीन 16 ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसवण्यासाठी वाहतूक शाखेने महापालिकेला मार्च महिन्यात प्रस्ताव दिला होता. पण मार्च महिन्यात जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक झाली. त्यात हा विषयच आला नाही. त्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार्‍या नियोजन बैठकीत प्रस्ताव सादर केला आहे. या बैठकीत निधीला मंजुरी मिळणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे. सुरक्षित वाहतूक आणि जिवितहानीबद्दल नियोजन समितीच्या संवेदनशीलतेची एका अर्थाने कसोटीच या बैठकीत लागणार आहे.
16 सिग्नलशिवाय झेब्राक्रॉस पट्टे रंगवणे, वाहनचालकांना माहिती देणारे फलक शहरात जागोजागी लावणे ही कामेही आहेत. शहरातील तीन आमदार प्रत्येकी 25 लाख, जिल्हा नियोजन समितीकडून 50 लाख व महापालिका बजेटमध्ये 25 लाख अशी तरतूद करण्याचे 2 मार्च रोजी झालेल्या बैठकीत ठरले होते. या बैठकीस तत्कालीन पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, तत्कालीन आयुक्त अजय सावरीकर, पोलिस आयुक्त प्रदीप रासकर हे उपस्थित होते. त्यानुसार मनपाने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव दिला, त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार असून, त्यात सिग्नल बसवण्यासाठी निधी मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. बुधवारी महापालिकेच्या विद्युत विभाग अधिकार्‍यांना प्रस्तावाबाबत विचारल्यानंतर मार्च महिन्यातच प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात आले आहे.
नवीन प्रस्तावित सिग्नल या चौकांत आहेत
डॉ. आंबेडकर चौक (पार्क चौक), भय्या, रामलाल, डीआरएम कार्यालय, गुरुनानक, शिवाजी चौक, डाकबंगला, सातरस्ता, मरिआई, पोटफाडी, व्हीवको प्रोसेस, मार्केट यार्ड, आयटीआय चौक. संभाजी तलाव (कंबर तलाव) या ठिकाणी पादचारी सिग्नल आहे.
सध्या सिग्नल असलेले चौक
जुना बोरामणी नाका, शांती चौक , आम्रपाली चौक , संत तुकाराम चौक, आसरा, जुना होटगी नाका, गांधीनगर, पत्रकारभवन, जुना एम्प्लॉयमेंट चौक , सिव्हिल चौक , रंगभवन, डफरीन, सरस्वती चौक.