आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सिग्नलसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष द्यायचे का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विकासाच्या दिशेने झेपावणारे शहर अशी ओळख सोलापूरची. लोकसंख्या दहा लाखांच्या घरात. वाहनांची संख्या पाच लाख. फक्त दोन चौकात (सरस्वती व डफरीन चौक) सिग्नल दिवे सुरू. अकरा चौकात सिग्नल दिवे बंद अवस्थेत. मागील चाळीस दिवसांपासून ‘दिव्य मराठी’ सिग्नल दिवे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. महापालिका व पोलिस प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. शहरातील तीनही आमदार, नगरसेवक, महापौर, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त यांनी बाजू मांडली. पण, दिवे काही सुरू झाले नाहीत. एवढेच नव्हे तर डॉक्टर, वकील, प्राध्यापक,महिला, तरुण, नागरिकांनी याबाबत आपले म्हणणे मांडले. एवढेच नव्हेतर मनसेप्रमुख राज ठाकरे सोलापुरातील आपल्या जाहीर भाषणात सिग्नलबाबत भाष्य केले. ही वेळ सोलापूरकरांवर का यावी. आता याविषयात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच लक्ष घालावे काय?

सोलापूरकरांची मात्र भाबडी आशा आहे, की आज सोलापुरात आल्यानंतर मा. शिंदे साहेब यांनी सिग्नल दिवे सुरू करण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाला आदेश द्यावेत. हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे, याची सोलापूरकरांना खात्री आहे. कारण येथील नेत्यांना, अधिकार्‍यांना जनतेशी काहीच देणेघेणे नाही. साहेबांची कृपा राहावी यासाठी मात्र हे आसुसलेले असतात.