आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur SMC And Minister Laxman Dhoble Sanction Big Project

आठ कोटींच्या रस्त्यांना सभागृहातून मिळेल मार्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जिल्हा वार्षिक योजनेतून शहरात आठ कोटींची रस्ते करण्यात येणार आहेत. पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार दिलीप माने, आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या पत्रानुसार कामाची यादी तयार करण्यात आली आहे. त्या कामास मंजुरी मिळावी म्हणून महापालिका आयुक्तांकडून सभागृहापुढे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजता होणार्‍या सभेपुढे विषय आहे.

मे महिन्याची सभा शनिवारी महापौर अलका राठोड यांनी बोलावली आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आठ कोटींचे रस्ते त्यात शासन आणि मनपाचा प्रत्येकी चार कोटींचा वाटा असणार आहे. या कामासाठी आमदार माने यांनी चार पत्र तर ढोबळे आणि देशमुख यांचे प्रत्येकी एक पत्र आले. त्यांनी कामे सुचवलेली आहेत. त्यानुसार आयुक्तांनी पूर्वगणनपत्रास मंजुरी मिळावी म्हणून सभागृहापुढे विषय आणला आहे.

यूजर चार्जेसला विरोध
रेनेज अथवा तत्सम सुविधाच पुरविल्या जात नाहीत. त्या भागात यूजर चार्ज आकारू नये, असा ठराव झालेला आहे. तरीही प्रशासन यूजर चार्ज घेत आहे. त्यांची आकारणी करू नये, असा प्रस्ताव नगरसेवक राजकुमार हंचाटे, अनिल पल्ली यांनी पटलासमोर आणला आहे.

धुम्मा वस्तीजवळ रेल्वे भुयारी मार्ग
खमितकर अपार्टमेंट ते धुम्मा वस्तीकडे जाणार्‍या मार्गावर रेल्वे रूळ असल्याने तेथे भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. त्याचा खर्च मनपास करावा लागणार आहे. सुरुवातीला दोन टक्के प्रमाणे तीन लाख रेल्वेकडे जमा केलेले आहेत. या कामास 3.25 कोटी खर्च येणार आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून रक्कम मंजूर करणे आणि रेल्वे बरोबर करार करण्यास आयुक्तांना अधिकार देण्याचा विषय सभागृहात आहे.