आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुभाजकावरून आयुक्तांना घेतले फैलावर, अजित पवार यांनी दिला कारवाईचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील रस्ते, दुभाजकाची वाईट स्थिती यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांना रविवारी सुनावले. विमानतळ ते शासकीय विश्रामगृहापर्यंत पवार मोटारकारने आले. येताना त्यांनी रस्ते, दुभाजक याची स्थिती पाहिल्याचे सांगितले.

ते म्हणाले, की रस्त्याची अवस्था दयनीय, दुभाजकाकडे पाहिले तर तेथे फक्त माती, झाडाचा पत्ता नाही. त्याच्या बाजूला साचलेला मातीचा ढिगारा साचलेला आहे, असे वर्णनही त्यांनी केले. दरम्यान, कार्यकर्त्यांना शरद पवारांनी दुभाजकातील झाडांविषयी व्यक्त केलेल्या नाराजीची आठवण दिली. त्यानंतर अजित पवार यांनी र्शी. सावरीकर यांना चांगेलच सुनावले. त्यावर कर्मचारी कमी असल्याचे गार्‍हाणे र्शी. सावरीकर यांना मांडले. त्यावर पवारांचे समाधान झाले नाही. महापालिका प्रशासनाचा खर्च 35 टक्केपेक्षा जास्त ठेवला जातो. त्यामुळे कर्मचार्‍यांची भरती होऊ शकत नाही. मग शहराचा विकास होणार कसा, असा सवाल त्यांनी केला. अन्यथा कारवाई करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुभाजकातील झाडांविषयी बोलले
रस्ता दुभाजकावर यापूर्वी झाडे लावली होती. ती पाण्याअभावी जळून गेली. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूचना केल्या आहेत. त्याकडे लक्ष देण्यात येईल.’’ अजय सावरीकर, आयुक्त, महापालिका