आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुडेवार छा गये, सत्ताधार्‍यांना दणका; महापौरांना खंत 178 विषयांचा अधिकार संपला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नागरिकांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी नागरिकांनी नियुक्त करून पाठवलेले महापालिकेतील लोकप्रतिनिधी नागरिकांच्या विश्वासाला अपात्र ठरल्याचे दिसून आले. नागरिकांच्या प्रश्नी महापालिका सभागृहात आलेल्या विषयावर 90 दिवसांच्या आत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असते. परंतु सत्ताधारी दुखवटा प्रस्ताव मांडण्यातच मशगुल राहिले. त्यामुळे कायद्यानुसार सभागृहातील 178 विषयांवरील अधिकार संपला. त्यानुसार पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाई करत पुढील निर्णय प्रक्रिया सुरू केली. यामुळे सत्ताधार्‍यांना अकार्यक्षमतेची चपराक बसली. यात जुळे सोलापुर विकास आराखडा विषयाचाही समावेश आहे.
सभागृहात 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस विषय प्रलंबित असेल तर तो सभागृहास मान्य आहे असे गृहीत धरून आयुक्त त्या प्रस्तावाची अंमलबजावणी करू शकतात. लोकहिताचे निर्णय असतील तर शासनास त्याबाबत माहिती देऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करून तसे काम आयुक्त सुरू करू शकतात.

योग्य निर्णय
आम्ही सभागृहात मागणी केली होती. त्यानुसार आयुक्तांनी प्रलंबित विषय मागवून घेतले. त्यांनी योग्य निर्णय घेतला असून, विकासाला गती दिली आहे. हीा सत्ताधार्‍यांची नामुष्की आहे. जगदीश पाटील, नगरसेवक

90 दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेले सभागृहातील काही विषय आयुक्तांनी मागवून घेतले. त्या विषयांवर आम्ही निर्णय घेऊ शकलो नाही यांची खंत वाटते. अलका राठोड, महापौर

सन 2007 ते मार्च 2013 या काळात सभागृहात प्रलंबित असलेले 178 विषय संबंधित खातेप्रमुखांकडे पाठवले. नागरी सुविधेतील विषयांवर प्राधान्याने निर्णय घेणार आहे. चंद्रकांत गुडेवार, पालिका आयुक्त

हे आहेत महत्त्वाचे विषय
जुळे सोलापूर विकास आराखडा, विजापूर रोडवर मॉर्निग वॉक ट्रॅक करणे, हद्दवाढ नागरिकांनी एकवट रक्कम भरल्यास बिलात 25 टक्के सूट, स्मशानभूमी सुधारणा करणे, बैलगोठा शॉपिंग सेंटरचे बंद गाळे, मॉडेल रस्ते विकसित करणे, शहर विकास नियंत्रण नियमावलीत बदल, माटे बगीचा विकास, अवैध बांधकाम नियमित करणे, सोरेगाव जलशुध्दीकरण डीएसी वापरणे, अंत्रोळीकर नगर, विजापूर रोड, कुमठा नाका येथे नाला बांधणे, एमआयडीसीत पथदिवे, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अहवाल, जिल्हा वार्षिक योजनेतील कामे, जागा भूसंपादन, जागेचे आरक्षण बदलणे, यूजर चार्जेस स्थगिती उठवणे, झोपडपट्टी विकास घरकुल योजना, 13 व्या वित्त आयोगातून 8 कोटीची कामे, साहित्य परिषदेसाठी जुळे सोलापुरात जागा देणे, संभाजी तलाव सुशोभिकरण आदी.