आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहारप्रकरणी महापालिका कर्मचारी जगलेस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी ब्लँकेट व सतरंजी खरेदी प्रकरणात महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी पॉल मॅथ्यू जगले या कर्मचार्‍यास न्यायदंडाधिकारी श्रीमंत भोसले यांनी 11 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

जगले महापालिका नागरी समुदाय विकास प्रकल्प विभागातील समूह संघटक पदावर कार्यरत आहे. त्याने लोकरीचे ब्लँकेट आणि सतरंजी खरेदी विनासंमती करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रकल्प संचालक लक्ष्मण बाके यांनी फिर्याद दिली.

यूसीडीत कसून चौकशी
महापालिकेतील 54 लाखांच्या अपहारप्रकरणी नागरी समुदाय विकास प्रकल्प संघटक पॉल जगले यास शनिवारी चौकशीसाठी प्रकल्प कार्यालयात आणले होते. तपास अधिकारी रवींद्र थोरात, पोलिस नाईक प्रसाद कुलकर्णी यांनी जगले यांची कसून चौकशी केली. काही कागदपत्रे ताब्यात घेतली. यावेळी यूसीडीत सामसूम होती. रमाई आवास योजनेत काही संबंध नसताना जगले यांनी 53.82 लाखांचा अपहार केल्याचा संशय आहे. याशिवाय अन्य काही प्रकरण जगले यांनी केले आहे का? याची चौकशी यूसीडी विभागाकडून होण्याची शक्यता आहे.