आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी महापौर बंडप्पा मुनाळे यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूरचे माजी महापौर, काँग्रेसचे नेते बंडप्पा मुनाळे (वय-86) यांचे बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी वीरशैव रुद्रभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे सुभाष व जगदीश ही दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. 1952 ते 1992 या 40 वर्षांच्या कालावधीत नगरसेवक म्हणून निवडून येत होते. 1987-88 मध्ये ते महापौर होते. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते परिचित होते. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे ते विश्वासू म्हणूनही ओळखले जात होते. त्यांनी तीन वेळा महापालिकेत काँग्रेसचे पक्षनेतेपद भूषवले होते. सोलापूर जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. ते कबड्डीपटूू होते. त्याकाळात प्रसिद्ध असलेल्या जयभवानी तरुण मंडळाची स्थापना त्यांनी केली होती.