आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेला हवे आहेत 10 अधिकारी अन् 1014 कर्मचारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील दहा लाख नागरिकांच्या पालिका प्रशासनाचा गाडा केवळ चार हजार 361 कर्मचार्‍यांवर सुरू आहे. अतिरिक्त आयुक्तांसह 10महत्त्वाची पदे रिक्त आहेत, तर 1014 कर्मचार्‍यांची भरतीच झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना मिळणार्‍या सोयीसुविधांवर परिणाम होत आहे. आयुक्त, साहाय्यक आयुक्त, सार्वजनिक आरोग्य अभियंता, मुख्य लेखापाल हे चार अधिकारी शासनाचे आहेत. त्यांच्यावरच कामाचा ताण असून, भविष्यात हा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कामावर परिणाम
अधिकार्‍यांची पदे रिक्त असल्याने महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. 29 जुलै रोजी आयुक्त, साहाय्यक आयुक्त मुंबई दौर्‍यावर होते. त्यावेळी शहरात जबाबदार अधिकारी नव्हते. सफाई कर्मचार्‍यांची कमी संख्या असल्याने शहरातील स्वच्छतेवर परिणाम होत आहे. 1014 पदे रिक्त आहेत.

ही पदे आहेत रिक्त
अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, आरोग्याधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, साहाय्यक आयुक्त प्रशासन, विशेष कार्यकारी अधिकारी हद्दवाढ, महिला व बालकल्याण, परिवहन व्यवस्थापक, साहाय्यक संचालक नगररचना, जनसंपर्क अधिकारी.

यांच्याकडे आहे अतिरिक्त पदभार
साहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे : साहाय्यक आयुक्त प्रशासन, आरोग्य विभाग, नगर अभियंता

मुख्य लेखापाल सुकेश गोडगे : मुख्य लेखापरीक्षक, हद्दवाढ, अंतर्गत ऑडिट

राजीव आवास योजना समाज विकास अधिकारी लक्ष्मण बाके : नागरी दारिद्रय़ निर्मूलन (यूसीडी)

महापालिकेचे प्रस्ताव
दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने राज्य सरकारकडे पुढील प्रस्ताव सादर केले. रिक्त पदे भरणे, आस्थापन खर्च अट शिथिल, वर्ग 1 मधील अधिकार्‍यांची शासनाकडून प्रतिनियुक्ती

कर्मचारी कमी असल्याने कामाचा ताण पडतो. असलेल्या कर्मचार्‍यांना सुविधा दिल्या जात नाहीत. पाच वर्षांपासून सफाई कर्मचार्‍यांना पुरेसे साहित्य दिले गेले नाही. नागरिकांना चांगली सुविधा देण्यासाठी रिक्त पदे भरली पाहिजेत.’’ अशोक जानराव, अध्यक्ष, कामगार संघटना

जबाबदारीचे पद असल्याने प्रत्येक कागदावर स्वाक्षरी करताना वाचावा लागतो. त्यामुळे कामाचा ताण पडतो. मागील तीन महिन्यांपासून 14 ते 15 तास काम सुरू आहे. त्यामुळे घरात आणि कार्यालयात कधीकधी चिडचिडेपणा येतो.’’ डॉ. पंकज जावळे, साहाय्यक आयुक्त