आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा विरोधीपक्ष नेता निवडीवरून धुसफूस; भाजपच्या मेळाव्यावर बहिष्काराचे सावट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांचा मेळावा सोमवारी होणार आहे. बैठकीच्या तयारीसाठी शनिवारी सिव्हिल चौकातील पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक झाली. सुमारे 80 कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेवक पांडुरंग दिड्डी, मोहिनी पत्की, रोहिणी तडवळकरसह आठ नगरसेवक आणि वीरभद्रेश्वर बसवंतीसह पंधरा जणांनी बैठकीवर बहिष्कार कायम ठेवला. गटबाजीच्या सावटाखालीच भाजपचा मेळावा होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा सोमवारी सकाळी गावडे मंगल कार्यालयात होणार असून, त्यासाठी सुमारे 500 कार्यकर्ते येणार आहे. त्याशिवाय सायंकाळी चार वाजता शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. बैठकीत संबंधित कार्यकर्त्यांकडे जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्या आठ नगरसेवकांना आयुक्तांकडे राजीनामा द्या असे पक्षाकडून सांगण्यात आल्याची माहिती मिळाली.


असा असेल तावडेंचा दौरा
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता विनोद तावडे सोमवारी (दि. 8) सोलापूर दौर्‍यावर येत आहेत. सकाळी सात वाजता सिद्धेश्वर एक्स्प्रेसने आगमन. साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत शासकीय विर्शामगृहात राखीव. दहा वाजता गावडे मंगल कार्यालयातील भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी बैठकीस उपस्थिती. सायंकाळी पाच वाजता शासकीय विर्शामगृहात आगमन. साडेदहा वाजता सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

तक्रार करूनही घेतली नाही दखल
महापालिका विरोधी पक्षनेता निवडीवरून नगरसेवक रोहिणी तडवळकर, र्शीकांचना यन्नम, इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली, नागेश वल्याळ, पांडुरंग दिड्डी, नरेंद्र काळेसह वीरभद्रेश्वर बसवंती, राजकुमार काकडे, जयवंत थोरात यांची नाराजी कायम आहे. पक्षाकडे तक्रार करूनही आमची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे शनिवारच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे या गटाकडून सांगण्यात आले.

तावडे, फडणवीसांसह आमदार येणार
मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमदार विनोद तावडे, राम शिंदे, बाळा बेगडे, सुरजिंदसिंह ठाकूर, आमदार चंद्रकांत पाटील, प्रकाश शेंडगे, प्रकाश हरवळकर, सुरेश ख्याडे, गिरीश बापट, सुभाष देशमुख, माधुरी पिसाळ, पंकजा मुंडे, संभाजी पवार येणार असल्याची माहिती शहर सरचिटणीस प्रा. अशोक निंबर्गी यांनी दिली.

‘त्यांना’ निमंत्रण दिले
त्या आठ नगरसेवकांसह पक्षातील पदाधिकार्‍यांना मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी बैठकीचे निमंत्रण दिले. 100 कार्यकर्ते हजर होते. मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. ते नगरसेवक निमंत्रण देऊन आले नाहीत, त्याला मी काय करणार? विजयकुमार देशमुख, आमदार, भाजप शहराध्यक्ष