आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समितीच्या आठ सदस्यांना चिठ्ठय़ा टाकून करणार निवृत्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका स्थायी समितीतील 16 पैकी आठ सदस्य एक मार्च रोजी निवृत्त होणार आहेत. या आठ सदस्यांची नावे एक फेब्रुवारी रोजी चिठ्ठय़ा टाकून लहान मुलाच्या हातून काढण्यात येणार आहेत. स्थायी समिती सभेच्या अजेंड्यावर हा विषय आला आहे. नंदीध्वज मार्गावरील रस्ते दुरुस्तीसाठी 17.45 लाख रुपयांचा खर्च असून, कार्याेत्तर मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे विषय आला आहे.

स्थायी समितीत 16 सदस्य असून त्यापैकी आठ सदस्य पहिल्या वर्षात बाहेर जाणार आहेत. त्यानंतर दोन वर्षांनंतर टप्प्याटप्प्याने आठ सदस्य बाहेर जाणार आहेत. त्यानंतर एक मार्च रोजी नवीन आठ सदस्य निवडले जातील. संबंधित पक्षांच्या सदस्यांचीच रिक्त जागांवर वर्णी लागेल.

सत्ताधारी आघाडीतील करारानुसार यंदा स्थायी समितीचे सभापतिपद राष्ट्रवादीकडे असेल. नगरसेवक पद्माकर काळे, बिस्मिल्ला शिकलगार, किशोर माडे, निर्मला जाधव हे राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. विद्यमान सदस्यांत सभापती पदासाठी शिकलगार आणि काळे इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. शहरात 91 किलोमीटरची अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात आली. 38 किलोमीटरची पाइपलाइनसाठी पाच कोटी 11 लाख 49 हजार रुपये खर्चास मान्यता देण्याचा विषय स्थायीत आहे.

नगरसेविकेच्या लेटरपॅडचा गैरवापर
जिल्हा नियोजन समितीच्या प्रस्तावित 28 कोटी रुपयांचा आराखड्यात सव्वा कोटी रुपयांची अतिरिक्त कामे सुचवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुनीता कारंडे यांच्या लेटरपॅडचा गैरवापर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. कारंडे यांना माहिती नसताना त्यांच्या लेटरपॅडवर हस्ताक्षरांत प्रभाग 13 मधील कामे सुचवण्यात आली. पक्ष कार्यालयातून लेटरपॅड घेऊन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीच हा प्रकार केल्याची चर्चा आहे. नोव्हेंबर महिन्यातील सभा बुधवारी घेण्यात येणार आहे. 1.25 कोटींची वाढ सुचवण्यासाठी लेटरपॅडचा वापर करण्यात आला.

यातून आठ जाणार बाहेर
विनायक कोंड्याल, मेघनाथ येमूल, बाबा मिस्त्री, सुशीला आबुटे, संजीवनी कुलकर्णी, अविनाश बनसोडे, पद्माकर काळे, किशोर माडे, बिस्मिल्ला शिकलगार, निर्मला जाधव, सुरेश पाटील, अनंत जाधव, शशिकला बत्तुल, मनोज शेजवाल, नरेंद्र काळे, आनंद चंदनशिवे.

सही माझी नाही
माझ्या लेटरपॅडचा दुरुपयोग झाला आहे. चंदनशिवे यांनी दाखवलेल्या लेटरपॅडवरील हस्ताक्षर आणि सही माझी नाही.’’
सुनीता कारंडे, नगरसेविका