आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी मोठी चुरस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना अपक्ष उमेदवारांनी पदयात्रा काढुन प्रचाराची सांगता केली. गेल्या दोन ऑक्टोबरपासून सुरू झालेला प्रचाराचा धुराळा अखेर शांत झाला. उमेदवारांची संख्या पाहता मतविभागणीचा फटका बसू नये याची काळजी प्रमुख उमेदवार घेत असून त्यासाठी प्रसंगी लक्ष्मी दर्शनाचा योग मतदारांना घडवून आणण्याचे प्रकार सुरू झालेत.
देशमुखयांची मंद्रूपमध्ये पदयात्रा
भाजपचेसुभाष देशमुख यांनी रविवारी सकाळी मंद्रूप च्या मुख्य रस्त्यावरुन पदयात्रा काढून माळी गल्लीत सभा घेतली. तसेच साेलापुरातील हद्दवाढ भागात पदयात्रेद्वारे प्रचाराची सांगता केली. राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब शेळके, आनंदराव देवकते, बसवराज बगले यांनी काल मंद्रूपला पदयात्रा काढून सभा घेतली. मात्र यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गोपाळराव कोरे नव्हते. आम्हाला पदयात्रेची माहितीच कोणी दिली नाही. कोरे यांचा सभेतील अपमान आम्ही सहन करणार नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य अप्पाराव कोरे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. या प्रकाराने मंद्रूपच्या राजकीय समीकरणाचे गणित काय असेल याची जोरात चर्चा होत आहे.
मानेयांचा नई जिंदगीत प्रचार
काँग्रेसचेउमेदवार आमदार दिलीप माने यांनी प्रचाराचा शेवटचा दिवस हद्दवाढ भागातच घालवला त्यांनी नई जिंदगी परिसर आसरा परिसरातील काही नगरामधून पदयात्रा काढत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. शिवसेनेचे उमेदवार गणेश वानकर, मनसेचे युवराज चुंबळकर, एमआयएमचे अर्जुन सलगर यांनी सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागावर शेवटच्या दिवशी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून आले.
हसापुरेंचाजुळे सोलापुरात प्रचार
अपक्षउमेदवार सुरेश हसापुरे यांनी श्रीकांतनगर, दावत हॉटेल, भारती विद्यापीठ, आयटीआय मार्गे बंथनाळ मठापर्यंत पदयात्रा काढली. तसेच मंद्रूप मध्ये जावून गोपाळराव कोरे यांच्याशी राजकीय खलबते केल्याचे सांगण्यात आले. हसापुरे यांनी शहरासह हद्दवाढ भागात जोर लावला आहे. दुसरे अपक्ष उमेदवार रविकांत पाटील, माजी आमदार रतिकांत पाटील यांनी प्रचारातून सुटलेल्या भागावर लक्ष केंद्रीत केले. तसेच मतदान करुन घेण्याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. एकूणच प्रचाराचा शेवटच्या दिवसापर्यंत सर्वच मातब्बर उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावली. राजकीयदृष्ट्या आमदार माने, देशमुख शेळके, हसापुरे पाटील यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब शेळके यांच्या प्रचारार्थ हत्तुरे वस्ती येथे सभा झाली. यावेळी मनोहर सपाटे यांचे भाषण झाले.