आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीराम स्पोर्ट््स क्लबला कबड्डीचे विजेतेपद, जिल्हा ६५ िकलो वजनी गट कबड्डी स्पर्धेची रंगत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - श्रीरामस्पोर्ट्स क्लबने अकलूजच्या कृष्णप्रिया संघास नमवित जिल्हा ६५ किलो कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. लष्कर येथील वीर महाराणा प्रताप वाचनालयासमोरील मैदानावर अंतिम सामन्यात श्रीरामला कृष्णप्रिया संघाने १०-१० असे बरोबरीत रोखले. त्यानंतर प्रत्येकी पाच चढाईत श्रीरामने ७-४ अशी मात केली.
प्रथम चार संघास अनुक्रमे राजा गणपती लष्कर, सना ज्वेलर्स, युवा मित्रसेना लष्कर, राजवर्धन स्पोर्ट््स यांनी दहा, सात, पाच, तीन हजार रुपये बक्षिसांची रक्कम पुरस्कृत केली होती. प्रत्येक पाचशे रुपयांची वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली. ही पारितोषिके नगरसेवक देवेंद्र भंडारे क्रीडा भारतीचे अध्यक्ष विजय हरपाळे यांच्या हस्ते देण्यात आली.
सिद्धांत संघ शिस्तबद्ध संघाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत चार ग्रामीण भागातील संघासह १६ संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद््घाटन काँग्रेस आय शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी केले. श्रीराम स्पोर्ट््स राजवर्धन स्पोर्ट््स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा राष्ट्रीय कबड्डीपटू मरगू जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिली होती.

प्रथम चार संघ : श्रीरामस्पोर्ट्स, कृष्णप्रिया अकलूज, न्यू सुभाष तरुण, फ्रेंडस मोहोळ.
सर्वोत्कृष्टखेळाडू : सुमीतझंपले (अष्टपैलू) भगत (पकड), आकाश रजपूत (चढाई).
बातम्या आणखी आहेत...