आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनी पुन्हा मारली बाजी; सोलापूरचा निकाल 75.24 टक्के

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2013 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर झाला. सोलापूरचा निकाल 75.24 टक्के लागला. शहर आणि जिल्ह्यातील टक्के पाहता मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे.

प्रथम र्शेणीत 17 हजार 450
जिल्ह्यातून एकूण 62 हजार 115 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला. त्यापैकी 61 हजार 808 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 46 हजार 505 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष र्शेणीतून आठ हजार 928, प्रथम र्शेणीत 17 हजार 450, द्वितीय र्शेणीत 16 हजार 887, तर तृतीय र्शेणीत तीन हजार 240 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

शहर आणि जिल्ह्यात मुलीचं हुशार!
शहर आणि जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलीचं हुश्शार असल्याचे मुलींनी दाखवले आहे. शहरात एकूण 10,332 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 7,087 उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी 68.59 इतकी आहे. तर 9,039 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली, यापैकी 6,923 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्याची टक्केवारी 76.56 इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. जिल्ह्यातून 34,766 पैकी 25,262 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी 72.66 इतकी आहे. 27,042 पैकी 21,243 विद्यार्थिनी उत्तीर्ण आणि त्यांची टक्केवारी 78.56 इतकी आहे. एकंदरीत शहर आणि जिल्ह्यातील मुलींच्या यशाची टक्केवारी पाहता मुलींनी मुलांना मागे टाकल्याचे चित्र आहे.

तालुक्यात बार्शीने मारली बाजी
सर्वाधिक टक्केवारी घेण्याचा मान बार्शी तालुक्याने मिळवला. 81.58 टक्के मिळवत बार्शी तालुक्याने सर्व तालुक्यांना मागे टाकले. बार्शी तालुक्यातून 5,741 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. 5,723 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 4,669 विद्यार्थी पास झाले.

प्रत्येक तालुक्याची टक्केवारी
अक्कलकोट : 58.87, बार्शी : 81.58, करमाळा : 79.68, माढा : 73.46, माळशिरस : 80.63, मंगळवेढा : 78.51, मोहोळ : 78.65, पंढरपूर : 77.88, सोलापूर दक्षिण, उत्तर शहर : 72.32, सांगोला : 77.21.

40 शाळांचा निकाल लागला 100 टक्के
दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील एकूण 40 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. जिल्ह्यातील 25 शाळांचा समावेश आहे. शहरातील 15 शाळांचा समावेश आहे. यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांची सरशी आहे. 15 पैकी आठ शाळा इंग्रजी माध्यमाच्या, पाच मराठी तर दोन उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 100 टक्के निकाल लागणार्‍या शाळांची संख्या वाढली आहे.

शून्य टक्के निकाल : महात्मा फुले प्रशाला, हजरत सुफी सरमस्त उर्दू हायस्कूल

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा
सेंट जोसेफ हायस्कूल, लिटल फ्लॉवर कॉन्वेनंट हायस्कूल, ज्ञान प्रबोधिनी बालविकास मंदिर, सुयश विद्यालय, महंमद युनूस उर्दू माडेल हायस्कूल (विडी घरकुल), मातोर्शी सौ. सरस्वती चाकोते प्रशाला (सोलापूर), एस. आर. चंडक (बुधवार पेठ), गांधी नाथा रंगजी विद्यालय (बाळी वेस), इंडियन मॉडेल स्कूल (जुळे सोलापूर), जय जवान जय किसान बाईस मिलिटरी स्कूल (नेहरू नगर), अलहाजी ए. डी. शेख उर्दू हायस्कूल (अक्कलकोट रोड), मॉडेल पब्लिक स्कूल (जुळे सोलापूर), राज मेमोरिअल इंग्लिश स्कूल (मुरारजी पेठ), बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल (उज्जैन नगर), व्हॅलेंटाइन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल (अक्कलकोट रोड).