आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी चालक निघाला चोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एसटीबसचा चालक चक्क दुचाकी चोर मिघाला. व्हिडीओ गेममध्ये पैसे हरल्याने तो कर्जबाजारी झाला होता. त्यातच स्वत:ची दुचाकी गहाण ठेवावी लागली होती. एखादी दुचाकी चोरून ती गहाण ठेवावी आणि त्याच्या रकमेतून आपली गाडी सोडून आणावी असा त्याचा बेत होता. मात्र, सीसीटीव्हीने हा त्याचा बेत उधळून लावला. नागेश्वर शिवाजी इरकशेट्टी (वय ३३, रा. कुमारनगर, मजरेवाडी, होटगी रस्ता) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. त्याचा साथीदार बेपत्ता आहे.

त्याचे झाले असे की, शिवाजी चौकातील अमृततुल्य हॉटेलजवळून सप्टेंबरला दुपारी एकच्या सुमारास दुचाकी चोरीस गेली. त्याची फिर्याद अविनाश अण्णासाहेब मंजुळे (रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड, सध्या- समर्थ कॉटेज, अमृततुल्य हॉटेलमागे) यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. हॉटेलच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याचे िचत्रफीत तपासली असता दोघे तरुण चालत आले आणि जाताना दुचाकीवरून गेल्याचे दृष्य कैद झाल्याचे िदसले. त्याआधारे तपास सुरू झाला. संशियत आरोपी नागेश्वरचे नाव समोर आले. त्याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेली दुचाकी संभाजी तलावाजवळील पोस्टल कॉलनी परिसरात लपवल्याची मािहती त्याने िदली. पोिलसांनी दुचाकी जप्त केली आहे. त्याचा साथीदार पिंटू ऊर्फ अमोल भिवाजी इरकशेट्टीचा शोध सुरू असल्याचे पोिलसांनी सांिगतले.
गुन्हे शाखेच्या उपायुक्त पथकाने ही कामगिरी केली. पोलिस उपायुक्त नीलेश अष्टेकर, साहाय्यक आयुक्त शर्मिष्ठा घारगे, साहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खाडगे, हवालदार संगीतराव कसबे, प्रभाकर जगताप, प्रतुल सुरवसे, समीर शेख, मंजुनाथ मुत्तनवार यांचा समावेश आहे. फौजदार चावडी पोलिस तपास करीत आहेत.
.. अन् दुचाकी चोरली
संशयितआरोपी नागेश्वर व्हिडीओ गेम खेळत असे. त्यात तो पाच हजार रुपये हरला. दुचाकी गहाण ठेवून पैसे आणले आणि तेही हरले. एखादी दुचाकी चोरायची आणि गहाण ठेवून आपली दुचाकी सोडवून घ्यायची असा डाव होता. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे त्याचा डाव फसला.