आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरातील दगड ‘नासा’च्या प्रयोगशाळेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूरच्या नितीन गायकवाड याने संशोधनासाठी पाठवलेला अनोखा दगड अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने स्वीकारला. त्यास नितीनचे नावही दिले आहे. तो शिवदारे महाविद्यालयात एमएस्सी करत आहे.

नोव्हेंबर 2011 मध्ये हा दगड त्यास होटगी तलावाजवळ सापडला होता.‘नासा’ पृथ्वीवरील विविध भागातील दगडांचे नमुने गोळा करून वातावरणाचा अभ्यास करत आहे. त्याची माहिती नितीनने इंटरनेटवरून मिळवली होती. त्यानंतर त्याने तो दगड ‘नासा’ला पोस्टाने रवाना केला. त्यासोबत मिळालेल्या ठिकाणाचे छायाचित्र आदी माहिती पाठवली. दगडातील मिर्शणाचे विश्लेषण करून नासाने ते प्रयोगशाळेत ठेवले आहे.

‘नितीन गायकवाड याने सूर्यमालेतील गृहांच्या शोधप्रक्रियेत ‘युनिक रॉक’ (खास दगड) पाठवून मोलाची मदत’ केल्याचा उल्लेख प्रमाणपत्रात आहे. या दगडाला यादीत समावेश करत ‘आरएटीडब्ल्यू 11637’ असे शास्त्रीय नामकरण केले आहे. दगडाचे प्राथमिक निरीक्षण झाले असून पुढील संशोधनासाठी नासाच्या प्रयोगशळेत तो ठेवलेला आहे.

लाव्हारसाचे मिश्रण
‘नासा’ने (नॅशनल एरोनॉटिक्स अँण्ड स्पेस एजन्सी) याविषयीचे प्रमाणपत्र नुकतेच गायकवाडला पाठवले आहे. त्यात दगडाच्या बनावटीवरही प्रकाश टाकला आहे. लाव्हारस, वाळू, ग्रेनाइट व संगमरवर यांच्या मिर्शणातून तो तयार झालेला आहे. रंगाने काळा असून त्यावर चमकणारे लाल ठिपके आहेत. त्याचे वजन सुमारे 200 ग्रॅम आहे.

नासा शोधात होते
‘नासा’ असे दगडाचे नमुने गोळा करत असल्याचे इंटरनेटवरून समजले. वेगळा असलेला माझ्याकडील दगड पाठवला. त्यांनी तो स्वीकारला. पृथ्वीच्या उत्पत्तीचा, वातावरणाचा शोध घेण्याच्या या प्रक्रियेत किंचिततरी माझी भूमिका असेल, ही भावना मनात आहे.’’ नितीन गायकवाड, एमएस्सी बायोटेक