आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात पथदिव्यांसाठी आले 22 लाखांचे साहित्य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील पथदिव्यांसाठी महापालिकेने 22 लाखांचे साहित्य मागविले आहे. आठ विभागीय (झोन) कार्यालयांनी मागितल्याप्रमाणे साहित्य मुंबईतील एका कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहे.
शहरातील पथदिवे बंद असल्याची वृत्तमालिका ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने पथदिवे दुरुस्ती मोहीम हाती घेतली. दिवे सुरू झाले. काही ठिकाणी साहित्यांची गरज होती. सूर्या रोशनी (मुंबई) कडून 22 लाखांचे साहित्य आलेले आहे. विद्युत विभागाच्या स्टोअर रूममधून मागणीप्रमाणे साहित्य देण्यात येत आहे. तत्कालीन प्रभारी आयुक्त अशोक जोशी यांनी विजेचे साहित्य खरेदी करण्याचा आदेश विद्युत विभागास दिला.
विद्युत दिव्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडे दरवर्षी 47.15 लाखांचे बजेट असून, त्याची तरतूद करण्यात आली आहे. असे असताना प्रत्यक्षात मात्र आर्थिक निधी देण्यास टाळाटाळ होत होती. शहरातील दिवाबत्तीची अवस्था पाहता बजेटमध्ये दोन टप्पे करण्यात आले. मनपा स्थायी समितीच्या मान्यतेनंतर दिवाबत्तीसाठी आवश्यक असलेल्या पार्टचे उत्पादन करणाºया कंपनीकडून साहित्य खरेदी करण्यात आले आहेत.

आर्थिक वर्ष संपले; दुसरा टप्पा नाही
आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक आहे. चालू आर्थिक वर्षात विद्युत विभागासाठी 47.15 लाख रुपये तरतूद असताना त्यापैकी फक्त 22 लाख रुपये दिले. अन्य 25 लाख रुपये देण्याबाबत शंका आहे. दिवाबत्ती दुरुस्तीच्या रकमेतून उपमहापौर कार्यालयात बसवण्यात आलेले एसी संच खरेदी केला.

झोनकडून मागणी करा
झोन कार्यालयाकडून मागणी झाल्यास पुरवठा करण्यात येईल. नवीन साहित्य बसवल्यावर जुने साहित्य स्टोअरमध्ये जमा करणे आवश्यक आहे. लाइट बंद असतील तर संबंधित झोन कार्यालयाकडे तक्रार केल्यास ती दुरुस्त केली जाईल, अशी माहिती पालिका विद्युत विभागाकडून देण्यात आली.