आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - वयअवघे तेरा आणि उंची तब्बल फूट इंच. याच उंचीच्या जोरावर त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या चाचणीसाठी अहमदाबाद येथे आमंित्रत करण्यात आले आहे.यशवंत राऊत असे त्याचे नाव असून तो शुक्रवारी अहमदाबादला जात आहे.
विजापूर रस्त्यावरील आदित्य नगरात राहणारे ब्रह्मदेव राऊत. कंदलगावच्या कांबळेवस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. त्यांना दोन
मुले आहेत. मोठी कन्या त्रिवेणी आणि मुलगा यशवंत. यशवंत हा श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेत नववीचा विद्यार्थी आहे. याच यशवंतची ही विक्रमी उंची आहे.
ब्रह्मदेव राऊत म्हणतात, यशवंत जन्मजातच उंच आहे. जन्मावेळीच तो दीड फूट होता त्याचे पाय पाळण्याच्याबाहेरपर्यंत यायचे. सामन्यांपेक्षा जास्त उंची असण्याला वैगुण्य
मानता त्याला सकारात्मक घेण्याचे शिकवले.
जवान किंवा व्हाॅलीबॉलचा खेळाडू
-उंचीमुळेस्वत:ला इतरांपेक्षा वेगळा समजत होतो. आता समजते आहे की, हा शाप नसून वरदान आहे. याचा उपयोग सैन्यात जवान अथवा भारतीय व्हॉलीबॉल संघात एक
खेळाडू म्हणून करू इच्छितो. या गोष्टीला पप्पा, मम्मी, दीदी यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी प्रोत्साहित केले आहेे. उंची वाढण्यासाठी व्यायाम करत नाही. ती नैसर्गिक अाहे.”
यशवंतराऊत,विक्रमीउंची असलेला मुलगा
अजून वाढणारच
-शरीरातील हार्मोन्सवर उंची वाढण्याची क्रिया अवलंबून असते. सध्या यशवंतचे वय १३ आहे. उंची वाढण्याचा काळ वयाच्या २२ वर्षांपर्यंत असतो. ही नैसर्गिक वाढ आहे.”
डाॅ.विद्याधर सूर्यवंशी
यशवंतचे प्रयत्न
उंचीखरेच जास्त आहे हे जाणल्यावरच त्याने स्वत:च लिमका आणि गिनीजमध्ये नाव येण्यासाठी नेटवर प्रयत्न केले. त्यात त्याला यश मिळाले असून अहमदाबादच्या
जिनीअस फाउंडेशनच्या वतीने त्याला १४ डिसेंबरच्या चाचणीसाठी बोलाविण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.