आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या इतिहास पुस्तकावर सोलापूरची उमटली मोहोर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - यंदाच्या दहावी अभ्यासक्रमाच्या इतिहास व राज्यशास्त्र क्रमिक पुस्तकात सोलापूर शहरातील तीन आणि पंढरपूरमधील एका शिक्षकाचा लेखक सदस्य मंडळात समावेश करण्यात आला आहे. संयुक्तरीत्या एकाच जिल्ह्यातील चौघांचा समावेश असणारी ही पहिलीच वेळ आहे.

शालेय अभ्यासक्रमातील क्रमीक पुस्तकातील अभ्यासक्रम बदलताना राज्यस्तरावर एक समिती गठन केली जाते. सबंध महाराष्ट्रातून विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षक तसेच प्राध्यापकांकडून त्या-त्या विषयाशी निगडीत माहिती मागविण्यात येते. यंदाच्या अभ्यासक्रमात सोलापूरच्या चौघांचा समावेश आहे.


राज्यस्तरावरील समितीत जिल्ह्याला मिळाली संधी
या शिक्षकांचा झाला समावेश
संतोष शिवाजी हंपे (दयानंद काशिनाथ आसावा सोलापूर), डॉ. रविकिरण नेताजी जाधव (दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर ), ऋतुराज बुवा (संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर), डॉ. विकास लक्ष्मण कदम (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर)


अभ्यासक्रमात झालेले बदल
विसाव्या शतकातील जग या मुख्य भागात साम्राज्यवाद, संघर्षमय विसावे शतक, आशिया व आफ्रिका खंडातील बंधमुक्ती, दुसर्‍या महायुद्धानंतरचे जग, लोकशाही, राजकीय पक्ष, लोकशाही व विविधता, लोकशाहीपुढील आव्हाने


यापूर्वीही आणि आताही
प्रा. बुवा यांचे मागील वर्षी नववीच्या पाठय़पुस्तकात आणि यंदाच् र्षी दहावी तसेच 12 वीच्या पुस्तकात लेख आहेत. तसेच प्रा. कदम यांच्या लेखाचाही यापूर्वी 12 वीच्या अभ्यासक्रमात समावेश होता. इतर दोघांचे हे पहिलेच वर्ष आहे. परंतु एकत्रितरीत्या सोलापूरच्या चार प्राध्यापकांचा समावेश असणारी ही पहिलीच घटना आहे.


निकषानुसार होते निवड
राज्यभरातील शाळा व महाविद्यालयांतील संबंधित विषयांच्या प्राध्यापक आणि शिक्षकांकडून विषयासंबधी माहिती मागविली जाते. शिवाय राज्यभरातील शिक्षकांकडून सादर करण्यात आलेली विषयाची माहिती राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला समजली पाहिजे हा निकष मुख्य असतो. तसेच राज्यभरातील शिक्षकांकडून प्राप्त विषयांचे सामूहिक वाचन, त्यावर बैठका घेऊन अंतिम निवड करण्यात येते. सज्रेराव जाधव, अध्यक्ष,राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे