आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखानदाराच्या घरातून 16 तोळे दागिने लंपास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अक्कलकोट रस्ता एमआयडीसी भागातील न्यू सुनील नगरमधील टेक्स्टाइल कारखानदार नारायण पोगुल यांच्या घरातून सोळा तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले. ही घटना शुक्रवारी उघड झाली. एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे.

नातेवाईकांच्या लग्न कार्यासाठी र्शी. पोगुल 31 मे रोजी वरंगळ (आंध्र प्रदेश) येथे गेले होते. त्या दरम्यान घराचा मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून कपाटातील दागिने चोरीला गेले आहेत. सोन्याचे तीन हार, अंगठय़ा, मंगळसूत्र, गंठण, कर्णफुले, झुमके असे एक़ूण सोळा तोळे दागिने चोरीला गेले आहेत. याशिवाय नथणी, चांदीचे पैंजण, बॅंकेची चांदीची नाणी चोरीला गेली आहेत. बाजारभावाप्रमाणे याची किंमत पाच लाख होते.

पोगुल परगावी गेल्यानंतर नातेवाईक रात्री घरी झोपत होते. एकेदिवशी पाऊस आल्यामुळे ते झोपायला आले नाहीत. दुसर्‍या दिवशी घर फोडल्याचे शेजारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. सोलापुरात आल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. श्वानपथक मागावण्यात आले. पण, पावसामुळे त्यालाही माग सापडला नाही. चोरांच्या मागावर असल्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तम जाधव तपास करत आहेत.

सिटी बस डेपोतून केबल चोरीस
सात रस्ता सिटी बस डेपोतून इलेक्ट्रीक वेल्डिंगसाठी वापरण्यात येणारी केबल चोरीला गेली आहे. मल्लिकार्जुन पडगानुरे यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली आहे. ही चोरी 11 मे रोजी उघडकीस आली असून आज फिर्याद देण्यात आली आहे. केबलची किंमत 11 हजार रुपये आहे.

दहा दिवसांत पन्नास तोळे गायब
मागील दहा दिवसांपासून सोलापुरातील चोरीची ही पंधरावी घटना आहे. सुमारे पन्नास तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची नोंद पोलिसात आहे. चोर्‍यांचे हे सत्र कधी थांबणार आहे.