सोलापूर- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या मुंबई येथे होणार्या सभेसाठी सोलापुरातून चार हजार कार्यकर्ते जाणार आहेत. 22 डिसेंबरच्या या जाहीर सभेसाठी शहर भाजपकडून नोंदणी करण्यात येत आहे. मुंबईला जाण्यासाठी पक्षाकडून स्वतंत्र रेल्वे करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली. नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याने कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी पुण्यात बैठक झाली. सोलापुरातून जाणार्या चार हजार पैकी दोन हजार कार्यकर्ते शहर उत्तर मतदारसंघातून जाणार असून, त्यांची नोंदणी सुरू असल्याचे र्शी. देशमुख यांनी सांगितले.