आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Traffic Problem And Traffic Control Issue

नियम मोडल्यास घरी समन्स, शहरातील गर्दीच्या चौकांतही होणार नियोजन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वाहतुकीचा नियम मोडून एखादा वाहनचालक, पोलिसाने थांबवण्याचा इशारा केला तरीही निघून गेल्यास त्याच्या घरी पोलिस दंडासाठी समन्स घेऊन हजर होणार आहेत. अर्थात वाहनाच्या नंबरप्लेटवरून त्याचा शोध घेण्यात येणार आहे. वाहतूक नियंत्रण शाखेचे नवे पोलिस साहाय्यक आयुक्त मोरेश्वर आत्राम यांनी शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी नवे पाऊल उचलले आहे.

र्शी. आत्राम यांनी शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला पांजरपोळ (शिवाजी चौक) चौकातील वाहतुकीची पाहणी केली. रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या रिक्षा, अँपेरिक्षा, हातगाड्या यांना हटकत त्यांनी शिस्तीचे बोल सुनावले. त्यानंतर वाहने, गाड्या हटल्याने रस्ता मोकळा झाला. यावेळी निरीक्षक वाय. बी. शिर्के हजर होते.

दरम्यान, शिवाजी चौकातच आत्राम यांच्याशी संवाद साधला असता, ट्रिपल सीट मोटारसायकल, अतिरिक्त प्रवासी रिक्षा, बेशिस्त वाहन चालविणे, पोलिसांच्या सूचना न ऐकणे, वाहतूक नियम मोडणार्‍या वाहन चालकांवर जागेवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी-पालकांना आवाहन
विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षांत प्रमाणापेक्षा जास्त मुले प्रवास करतात. ते असुरक्षित व धोकादायक आहे. 24 जूनपासून कारवाई मोहीत हाती घेणार असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कळवले आहे.


लवकरच शिस्त दिसेल
गर्दीचे ठिकाण, बाजारपेठा, सिग्नल चौकात वाहतूक नियोजन करणे यासाठी प्राधान्य राहील. अतिरिक्त प्रवासी रिक्षा, अँपेरिक्षा यांच्यावर कारवाई होणार आहे. शहरात लवकरच शिस्त दिसेल.’’ वाय. बी. शिर्के, वाहतूक पोलिस निरीक्षक

पोलिसांना वॉकी-टॉकी
सिग्नल यंत्रणा असलेल्या दहा चौकांत पोलिसांना वॉकी-टॉकी देणार आहेत. सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळेत सिग्नल चालू ठेवण्यासाठी सूचना देण्यात येतील. सिग्नल बंद झाल्यास तातडीने महापालिकेकडे कळवण्यात येईल. एखादा वाहनधारक नियम तोडून तसाच पुढे गेल्यास समोरील चौकात थांबलेल्या पोलिसाला वॉकीटॉकीवरून माहिती देण्यात येईल.

एसटी स्थानक प्रवेशद्वारात होणार बदल
स्थानकातून गाड्या बाहेर जाताना वाहतुकीची कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून गाड्या प्रवेश करतात तेथून आता बाहेर आणि बाहेर पडणार्‍या गेटमधून प्रवेश करतील. या बदलामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे पोलिसांना वाटते. पोलिसांनी आगार प्रमुखांना याचे पत्र दिले आहे. स्थानकाच्या नियंत्रण कक्षाच्या मागील बाजूस रिक्षा थांबतील. प्रवाशांना रिक्षा घेणेही सोपे होणार आहे.