आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूतन कुलसचिव मिळणार आज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या नूतन कुलसचिवपदासाठी अंतिम पाच उमेदवारांपैकी फक्त दोनच उमेदवार मुलाखतीसाठी हजर राहिले. त्यांच्या मुलाखती रविवारी विद्यापीठात झाल्या. यातील एकाचे नाव लखोटाबंद झाले आहे. मात्र, याची घोषणा सोमवारी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार करणार आहेत.

नांदेड विद्यापीठाचे उपकुलसचिव शिवशरण माळी व मुंबई विद्यापीठातील उपकुलसचिव दिनेश कांबळे यांनी मुलाखती दिल्या. मुलाखती पॅनेलमध्ये कुलगुरू डॉ. मालदार, महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. बी. एम. भांजे, पी. आर. गायकवाड, प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे, श्री. खोब्रागडे आदींचा समावेश होता. कॅ. डॉ. नितीन सोनजे यांनी साडेतीन वर्षांच्या कार्यकाळानंतर 5 एप्रिल रोजी कुलसचिवपदाचा राजीनामा दिला. भरती प्रक्रिया विद्यापीठाने राबविली होती. 11 अर्ज दाखल झाले होते. त्यातील पाच उमेदवारांना अंतिम मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले होते.

लखोटा कुलगुरूंकडे
कुलसचिव पदासाठी दोन उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यातील एका उमेदवाराचे नाव निश्चित करून लखोटा कुलगुरूंकडे सुपूर्द करण्यात आला. नावाची घोषणा ते करतील.’’ डॉ. बी. एम. भांजे, प्रभारी कुलसचिव

उमेदवार परिचय
शिवशरण माळी : मूळचे उमरगा तालुक्यातील येळी येथील आहेत. सोलापुरातच 12 वष्रे जाम मिलमध्ये लिगल अँडव्हायझर म्हणूनही त्यांनी कार्य केले. उमरगा येथून बी. कॉम, पुणे येथून एलएल.एम.ची पदवी घेतली. सध्या ते नांदेड विद्यापीठात कार्यरत आहेत.

दिनेश कांबळे : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था, अभ्यासक्रम व प्रशासन यात त्यांनी कार्य केले आहे. विद्यापीठांच्या राज्य संघटनेतही ते कार्यरत आहेत.