आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur University Declared Its Examination Result In Time

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निकाल वेळेत लावण्याच्या परीक्षेत सोलापूर विद्यापीठ ‘उत्तीर्ण’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बहुतांश अभ्यासक्रमांचे निकाल मुदतीत जाहीर केले. प्राध्यापकांच्या संपामुळे परीक्षा लांबल्या होत्या. त्यामुळे परीक्षा वेळेत होणे आणि त्याचे निकाल वेळेत लागणे हे विद्यापीठ प्रशासनासाठी आव्हानच होते.

पीएच.डी. व एम.फिल या विषयांचे निकाल बाकी असले तरी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या परीक्षांचे निकाल लागतील. कुलपती कार्यालयानेही परीक्षाविषयक कामकाज पूर्ण करण्याला प्राधान्य देत वेळेत पूर्ण केल्याचा खास उल्लेख केल्याची माहिती कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी दिली.


तब्बल 246 अभ्यासक्रमांच्या परीक्षा विद्यापीठ घेते. वर्षातून दोनदा परीक्षा घेणे, उत्तरपत्रिकांची तपासणी, त्यांचे लेजर बुक बनविणे व निकाल जाहीर करणे हे मोठे काम असते. अपुरे कर्मचारी ही मुख्य अडचण विद्यापीठासमोर आहे. प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीवरच बहिष्कार टाकला होता.

तब्बल 95 दिवस लांबलेल्या प्राध्यापकांच्या संपामुळे परिस्थिती अधिकच अवघड झाली. मात्र, विद्यापीठाने सर्वप्रथम अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे निकाल लावून विद्यार्थ्यांना दिलासा दिला. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात तात्पुरते प्रवेश देत मार्ग काढला. असे अनेक पर्याय शोधत या आव्हानास सामोरे जात परीक्षा विभागाने मोठी कामगिरी केली.


असे लागले निकाल
एम.ए., एम.कॉम, एम.एस्सी, एमबीए, एमएसडब्ल्यू, लॉ, प्री लॉ अशा उर्वरित अभ्यासक्रमांचे 234 कोर्सेसचे निकाल 45 दिवसांच्या आत लावले. अभियांत्रिकी : 20 ते 22 दिवस, बी.ए. : 30 दिवस, बी.कॉम. : 28 दिवस, बी.एस्सी. : 28 दिवस.


सुटी न घेता केले काम
शनिवार, रविवार वा इतर दिवशी सुटी न घेता बहुतांश कर्मचार्‍यांनी कामकाज केले. परीक्षा विभागाला अनेक अडचणीतून मार्ग काढत निकाल वेळेत लावता आले.’’ डॉ. दादासाहेब साळुंखे, परीक्षा नियंत्रक, सोलापूर विद्यापीठ