आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्र परीक्षेचा विषय पुन्हा विद्या परिषदेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने परीक्षा विभागावरील ताण कमी करण्यासाठी वर्षातून एकदाच परीक्षा देण्याच्या निर्णयाचा फेरविचार होणार आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेची बैठक येत्या 15 जानेवारीला होत आहे. त्यात याबाबत अनुकूल निर्णय होण्याची शक्यता आहे.

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) -तर्फे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी विद्यापीठास निवेदन दिले. वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण विषयांसाठी वर्षातून दोनदा परीक्षा देण्याची सोय होती. ती बंद करून केवळ मार्च किंवा नोव्हेंबरमध्येच परीक्षा देण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आहेत. निर्णय रद्द करण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी निवेदने दिली आहेत.