आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठाच्या परीक्षा गेल्या १० दिवस पुढे, विधानसभा निवडणुकीमुळे निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालययांतील ऑक्टोबर नोव्हेंबरमधील परीक्षा दहा दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील यांनी दिली. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता २८ ऑक्टोबरपासून सुरू होतील.

१५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने विद्यापीठातील शिक्षक कर्मचारी त्या कामात असतील. मतदानानंतरचे दोन दिवस निवडणूक कामासाठी लागणार आहेत. दरम्यान, दिवाळी सणानिमित्त कार्यालयीन सुटीही असेल. विद्यापीठ परीक्षेत सातत्य राहावे यासाठी त्या २८ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे नवे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विद्यापीठ परीक्षेसाठी शहर जिल्ह्यातील संलग्नित ११९ महाविद्यालययांतील सुमारे ७५ हजार विद्यार्थी प्रविष्ठ असतात.

२८ पासून परीक्षा
निवडणुकादिवाळी सुटी लक्षात घेता विद्यापीठाच्या परीक्षा २८ ऑक्टोबरपासून सुरू होतील. संलग्नित महाविद्यालययातील प्राचार्य, संचालक, प्रशासकीय कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी बदललेले वेळापत्रक लक्षात घेऊन त्याबाबतची योग्य ती कार्यवाही करावी. बी.पी. पाटील, परीक्षानियंत्रक, सोलापूर विद्यापीठ