आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्र परीक्षांसाठीचे अर्ज मिळणार ऑनलाइन !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी सत्र परीक्षेसाठीची प्रक्रिया यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने आखली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एक्झामिनेशन या लिंकखाली क्लिक केल्यास अभ्यासक्रमांच्या विविध लिंक्स समोर येतात. त्यात कोणत्या परीक्षेचा फार्म भरायचा आहे, त्या लिंकला क्लिक केल्यास विद्यार्थ्यांस आपल्या नावानुसार ए टू झेड या क्रमाने फॉर्म शोधता येतो.

आपल्याला हवा असलेला फॉर्म सेव्ह करावा, त्यांची पिंट्र घ्यावी. हा फॉर्म विद्यापीठात द्यावा. याबरोबर परीक्षेची फी सुद्धा विद्यापीठाच्या काऊंटरवर प्रत्यक्ष भरणे अपेक्षित आहे. इतकी सुटसुटीत प्रक्रिया केल्याने परीक्षा फॉर्म भरण्यातील किचकट प्रक्रिया टाळली जाऊ शकते.
हॉलतिकिटाची प्रिंट घेता येईल.

बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी हॉलतिकीट लॉगीन आयडीवर उपलब्ध करण्यात येणार आहे. हे हॉलतिकीट या संकेतस्थळावरूनच प्रिंट करून घेता येईल. आता यापुढे हॉलतिकीट पोस्टाद्वारे पाठवले जाणार नाही. संबधित बहिस्थ विद्यार्थ्यांची मूळ गुणपत्रिका परीक्षा अर्जावरील पत्यावरच पोस्टाने पाठवली जाणार आहे.

याआधीही आखली होती योजना
यापूर्वी बी.ई. भाग एक व बी.एस्सी. भाग एक साठी परीक्षा केंद्रावर थेट प्रo्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने पाठवण्याची योजना विद्यापीठाने आखली होती. मात्र, ही यंत्रणा अनेक त्रुटींमुळे कार्यान्वित होऊ शकली नाही. आता तब्बल 65 हजार विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन योजना आखली आहे.

अभ्यासक्रम व फॉर्म भरण्याची मुदत
बी. ए, बी. कॉम (सेमीस्टर 1 ते 6)- 26 फेब्रुवारी (विलंब शुल्कासह), 03 मार्च (अतिविलंब शुल्कासह)
एम. ए., एम. कॉम (सेमीस्टर 1 ते 4) : 18 मार्चपर्यंत (नियमित शुल्कासह), 24 मार्चपर्यंत (विलंब शुल्कासह), 28 मार्च (अतिविलंब शुल्कासह)

परीक्षेबाबतचे अर्ज दोन प्रतींत प्रिंट करून घ्यावेत. एक प्रत विद्यापीठात साक्षांकित करून द्यावी. याबरोबर परीक्षा शुल्क विद्यापीठात भरण्यात यावे. रिपीटर विद्यार्थ्यांसाठी आवेदनपत्राचा स्वतंत्र नमुना संकेतस्थळावर आहे. ज्यांचा पीआरएन नंबर दहा अंकी आहे त्यांनी 16 अंकी पीआरएन नंबर घेणे आवश्यक केले आहे.

बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी सुटसुटीत अशी प्रणाली आखण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार परीक्षा फार्म भरावे. डॉ. एस. व्ही. लोणीकर, प्र. परीक्षा नियंत्रक, सोलापूर विद्यापीठ